Thursday, October 05, 2006


NH-4 ..NH-206..NH-17..NH48

बर्याच दिवसांपासुन bike वरुन मोठी trip काढायची असं मनात होतं ... डोक्यानी १दा काही घेतलं म्हणजे ते पुर्ण होईपर्यंत चैन काही पडत नाही ... चांगली का वाईट सवय आहे माहित नाही पण आहे खरी ... असो .. तर ह्या ट्रिपचं प्लॆनिंग कित्येक दिवसांपासुन चालु होतं दिवस रात्र स्वप्नामध्ये ही मी १टा bike वरुन मस्त काळ्याकुळकुळीत रस्त्यावरुन मस्तवाल उधळलेल्या घोड्यासारखा चाललो आहे असं दिसायचं आणि blog लिहायचंही खुप दिवसापासुन मनात होतं पण लिखाणाच्या प्रचंड आळसामुळे कधी लिहीणं झालंच नाही . मग आज एकाबाजुला simulation run होतंय तोपर्यंत काहीतरी लिहावं .... १ चांगलं आहे इथे हस्ताक्शराचा किंवा खाडाखोडीचा प्रश्नच नाही ...
जोपर्यंत बंगलोरला आहे तोपर्यंत पुर्ण कर्नाटक पिंजुन काढायचा असं ठरवलं त्याची सुरुवात बंडीपुर आणि मुदुमलैच्या ट्रिपपासुन झाली .. आणि त्या series मधली ही पुढची ट्रिप .. दसयाच्या long weekend ला शनिवारच्या क्लासला सुटी मिळाली आणि बास त्याच दिवशी ठरलं की i should make best out of it .. plan was ready ...
होन्नेमरडु-जोग फ़ॊल्स - मुरुडेश्वर-मरवंथे beach - मालपे- st. mary's island -मंगलोर असा साधारण ११०० की.मी. चा प्रवास होता ...
शनिवार दि. ३०-०९-२००६
आदल्या दिवशी जाउन shell पेट्रोल भरुन घेतलं गाडीत .. टाकी full ..... सगळे म्हणतात की shell petrol चांगल असतं ... अजुन काही खुंखॊर results मिळाले नाहियेत :-( असो पण आता असा रिवाजच झाला आहे .... मी आणि माझा goan room mate असे आम्ही दोघंच जाणार होतो .. नेहमीच्या कानडी मेंब्रांना दसयासाठी घरी जायचं असल्यामुळे दोघंच .. ह्या लोकानी आम्हाला आतोनात शिव्या दिल्या अश्या वेळी ठरवली ट्रिप म्हणुन ... आणि कोणाला अस त्रास जळफळाट झाला तर ट्रिप ला जायला मजा येते :D ...
सकाळी सकाळी ४:१५ ला उठलो .. मित्राला तर झोपच आली नाही excitement मुळे. ५:१५ घरातुन(बंगलोर) बाहेर पडलो .
मस्तं थंड हवा होती अगदी pleasant वाटंत होतं .. डोळे मिटले तर आपोआप 'केंव्हा तरी पहाटे .. ' गाणं सुरु होइल असं वाटंत होतं . हे असं वातावरण अनुभवलं की शब्दं त्यान्ची लय चाल .. ह्यंची ताकद कळते ... ह्या गाण्यात जे आहे ते हेच असं वाटतं..
बंगलोर मधुन बाहेर पडलो आणि NH-4 ला लागलो काय मस्तं रस्ता आहे अगदी चाटुन पुसुन साफ़ केल्यासारखा स्वच्छ .. मग काय रस्त्यावरुन १०० च्या स्पीडनी आमची avenger निघाली ... वाटेत थांबायचं कामंच नाही ... बुलेट ही अशीच खुंखॊर गाडी आहे enfield ची machismo .. तिचं नावंच मस्तं आहे ... machismo .. पुरुषी माज :-) ... कुठली भारी गोष्टं व्हायची असेल तर माणसाध्ये थोडी मस्ती असली पाहिजे असं माझं मत आहे ...
असो तर रस्त्यावरुन जाताना १का ठिकाणी हिरवंगार डोळ्याना सुखवणारं शेत लागलं मग तीथे थांबुन रस्त्याचे त्या हिरव्यागार शेताचे शेंडा ढगात गेलेल्या त्या monolith डोंगराचे काही फोटो काढले ... तिथे रस्त्यावरुन १ प्रचंड मोठा truck चालला होता .. पवनचक्कीचं पातं किती मोठं असतं ते त्या दिवशी कळलं
फोटोमध्ये पाहिल्यावर एवढं जाणवंत नाही पण प्रकरण एकंदरीत बरच मोठं असतं ते कळलं .... बिच्चाया वायाला उगाच त्रास ... मग परत प्रवास सुरु झाला ते तुम्कुर पर्यंत ह्याच रस्त्यानी ...
तुम्कुर मध्ये डाव्या हाताला वळलं कि लागतो NH-206 ... हा रस्ता थेट होन्नावर पर्यंत असाच जातो होन्नावर म्हणजे कारवारच्या दक्षिणेला असलेलं १ गाव ... तालुका का आणखिन काय ते माहित नाही ... असो ते गौण आहे ;-) .
ब्रेक्फ़ास्टसाठी अर्सिकेरे गावात थांबायचं असं ठरवलं होतं... वाटेत १का ठिकाणी १दम सरळ रस्ता पट्टीनी आखल्यासारख्या आणि तितकीच रेखिव शेतं पाहुन थांबल्याशिवाय कसं रहावंणार ... मग थांबुन लगेच फोटो काढायला रस्त्याकडेला पळालो .. आणि तिथे घोटाभर चिखलात पाय भरवुन घेतला ... पण त्या frameशिवाय दुसरं काहीही त्या घडीला दिसत नव्हतं. तो बघण्या-दाखवण्याचा कार्यक्रम उरकुन आम्ही पुढे निघालो ... हे सगळं बघताना ... सुजलाम सुफ़लाम ... सोन्याचा धुर निघणारा देश वगैरे सगळं खरंच असेल असं पटायला लागतं ... एवढा स्वच्छ निसर्ग .. मोकळी हवा ... मस्तं पिवळा सुर्यप्रकाश .. सगळं कसं परिकथेतल्यासारखं .... असल्या ठिकाणी आल्यावर काही वाईट करण्याचं कोणाच्या डोक्यात ह्यावर विश्वास न बसण्याईतकं निरागस आणि प्रसन्न ....
बुडाखालच्या गाडीची चाकं आणि डोक्यातली ही चाकं १मेकांशी अशी स्पर्धा करत होती .... संपुर्ण भारात असा फ़िरुन पहायचा आहे मला असा ..... बदलत जाणारी माती .. झाडं, माणसं,बोली ... राहण्याची पद्धत असं बरच काही अनुभवल्याशिवाय ह्या देशाशी नातं असल्यासारखं वाटणार नाही ... चे ग्वेवेराला latin अमेरिकेत फ़िरल्यावर असंच काहीतरी वाटलं असणार ... भुकेची जाणिव व्हायला लागल्यावर डोक्यातल्या चक्राचा वेग कमी झाला आणि पर्यायानी गाडीचाही ... ही भुकेची ताकद ... कोणितरी मला म्हणाल्याचं आठवलं दोन हात दोन पाय आणि पोटात अन्न हे सगळ्यात मोठं भांडवल आहे .. पटलं.
मग अर्सिकेरे मध्ये पोट(त)भर ईडल्या आणि वडे खाल्ल्यावर मालक येउन विचारतो cigarette आणु का ?
असं विचारणारं हे पहिलंच हॊटेल.
तिथुन निघाल्यावर मग होन्नेमरडुच्या दिशेनी आम्ही निघालो ... म्हणजे रस्ता पकडुन आमची गाडी निघाली .... मग सागर cross केलं होन्नेमरडु कुठे आहे असं मोडक्या कानडीतुन विचारत निघालो .... १का ठिकाणी ते सागरच्या नंतरच आहे असं खात्रीलायक उत्तर मिळाल्यावर निघालो ... मध्ये गाडीनी १दा २दा आचके दिल्यासारखं केलं ...मी दुर्लक्ष केलं म्हटलं आली असेल reserve ला ... आणि १का ठिकाणी आल्यावर बंद पडली ... हालवुन पेट्रोल वाजतंय का ते पाहिलं आणि ....... :D ...
जे व्हायचं होतं ते झालं होतं ... रस्त्यावर १काला विचारलं पेट्रोल कुठे मिळेल तर सांगितलं ८ कि.मी. सागर मध्ये ...
मग ही २ चाकाची टेकडी ढकलत नेण्यापेक्षा लिफ़्ट घेउन पेट्रोल आणायचं ठरलं ... सुदैवानी लगेच १ माणुस भेटला आणि त्यानी थोडं पेट्रोल मिळवुन दिलं .. त्या भांडवलावर पंपापर्यंत गेलो आणि मग पुढचा प्रवास सुरु झाला ...
मध्ये १का ठिकाणि शांत रस्ता आणि झाडी पाहुन गाडी लावली आणि सरळ रस्त्यावर बसलो ... आणि माझा मित्रं तर चक्क लवंडला .... थोडावेळ आम्ह्यी दोघंही शांत बसुन शांताता ऐकत होतो ....
तिथुन पुढे साधारण १०कि.मी. वर १का ठीकाणी डाविकडे वळलं कि होन्नेमरडूकडे जाणारा रस्ता लागतो .... त्या रस्त्यानी पुढे गेल्या डाव्या बाजुला १ बस stop आहे तिथे डाविकडे वळुन रस्ता नेइल तसं पुढं जात रहायचं ... सुरुवातीला रस्ता मस्त आहे .. पण नंतर घाण आणखी घाण असा होत जातो .. पाउस नसेल तर जाता येइल पण जर पाउस सुरु झाला तर अवघड आहे मग फ़क्त ४ व्हील ड्राईव्ह ... ...
मग त्या रस्त्यातुन रस्ता शोधत कसेबसे त्या होन्नेमरडुला पोचलो ... तिथे गेल्यावर जे काही दिसलं त्यामुळे तो रस्ता ही त्याची फ़ी आहे ते समजलं .....
इतकं नितळ backwater मी आधी कधी बघितलं नव्हतं ... भंडारदर्याचं पाणी तसं आहे ..... it was just like a suffire in the mountains पण ... एका ngo ने ती जागा maintain केली आहे असं समजलं आणि त्याचं booking बंगलोर मध्ये करावं लागतं .... आणि ते केल्याशिवाय तिथल्या पाण्यात उतरता येत नाही ...
आणि माणसं ह्या बाबतीत ती माणसं perticualr आहेत हे पाहुन खुश झालो ...
मग आम्ही एवढ्या लांबुन आलो आहोत म्हणुन त्यानी आम्हाला coracle मधुन १ चक्कर मारुन आणली ..... ते झाल्यावर तिथल्या डोंगरावर थोडं फ़िरुन आलो. फोटो काढायची काही फ़ारशी भारी जागा मिळाली नाही ... म्हणजे आपल्याला जसं दिसतं ना तसं फोटोत येत नाही .....मग त्या नसलेल्या रस्त्यावरुन परत निघालो येताना काही फोटो काढले नाहीत ... पण जाताना मात्र पोझ देउन फोटो काढले.
हाच तो चिखलमय झालेला रस्ता. इथुन बाहेर निघालो आणि मग
कुठे वाटेत जेवायला मिळतं ते पहात चाललो होतो .. दुपारचे २-२:३० वाजले होते ... भुकेची वेळ होती आणि बरोबर आणलेले २ बिस्किटाचे पुडे कधीच संपले होते ... मग ठरवलं कि सरळ जोग फ़ॊल्सला जाउनच जेवायच. आतापर्यंत साधारण ३८५ कि.मी चा प्रवास झाला होता ... पुढे ३५ कि.मी गेल्यावर जोग फ़ॊल्स ला पोचलो ... तिथे गेल्यावर आधी हॊटेलमध्ये शिरलो .. मग हात धुवायाला निघालो असताना १का आजोबानी मला बोलावलं आणि कानडीत काहीतरी बोलले ... माझ्या चेहयावरच्या आश्चर्यामुळे त्याना त्यांची चुक समजली ... ते मला वेटर समजले होते ... आणी मला त्यावरुन मला मी चेहरा धुण्याची किती गरज आहे ते कळलं ... अवतार कसा झाला आहे ह्याचाही साधारण अंदाज आला ... मग वेटर मित्रानी आणलेल्या अन्नावर तुटुन पडलो .. पानातलं सगळं संपेपर्यंत आम्ही १मेकांशी गरजेपुरतं आणि तेही खुणेनं बोललो ... आमच्या समोरच्याच बाजुला १ मराठी कुटुंब येउन बसलं होतं ... मी जिथेही जातो तिथे मला १ तरी मराठी कुटुंब भेटतंच ... जेवण वगैरे आटोपुन आम्ही रहायची सोय होते का ते पहायला निघालो ... सगळीकडे नकार घेउन झाल्यावर शेवटी youth hostels मध्ये फ़क्त १०० रुपयात दोघाजणांच्या राहण्याची सोय झाली .. जोग फ़ॊल्सपासुन साधारण १ कि.मी. वर आहे ते .. तिथे sack टाकुन परत जोग फ़ॊल्सला गेलो ... एव्हाना ५ वाजले होते ... मग जिथुन उतरायला सुरुवात होते त्या जागी गेलो ... बास !! समोर जे दिसलं ते एवढं भव्य होतं की आपोआपच नतमस्तक व्हायला झालं .. प्रचंड उंचीवरुन जमिनीकडे झेपावणारं ते पाणी त्या प्रचंड शिळा .. सगळं काही भव्य .. उदात्त .. माणसानी काही न बोलता नम्र व्हावं असं. हिच ती भाषा .. न बोलता कळणारी universal .. as said in alchemist.
नेहमीइतका पाण्याचा जोर नव्हता तरीही ते दृष्य अतिशय देखणं होतं.खाली उतरायला सुरुवात करताना .. वाटेतला टपरीवाला म्हणाला " निचे जाकु आने जितना टाईम नही है" .. मी जायला बंदी वगैरे नाही ना असं विचारलं ... आपल्याकडे हे १ फ़ार असतं त्या ठिकाणी १खादा accident झाला की बंद करतात .. हा काय मुर्खपणा आहे .. आता उद्या रेल्वेखाली कोणी जीव दिला तर रेल्वे बंद करणार का ? असो .. तर खाली जायला सुरुवात केली .. वरती येणाया लोकांचे केविलवाणे चेहरे पाहुन किती खाली उतरायचंय त्याचा अंदाज यायला लागला होता .. खाली उतरल्यावर समोर अतिप्रचंड शिळा विखुरलेल्या होत्या .. त्यातुन वाट काढत खाली साठलेल्या पाण्याजवळ गेलो .. तिथे पोचायला आम्हाला साधारण २० मिनिटं लागली ... मग १ झकास धोंडा बघुन त्यावर आडवे झालो ... मस्तं तुषार अंगावर येत होते .. त्या अवाढव्य घळीत ते पाण्याचे तीन धबधबे पडत होते .. तिथे १ group उगाच आरडाओरडा करत होता .. १केकाच्या अंगाला दगड बांधुन पाण्यात टाकुन द्यावं वाटलं .. पण आमच्या सुदैवाने तो जनावरांचा कळप लवकरच तिथुन निघाला. मग त्या धबधब्याकडे बघत पडुन राहिलो ... बघताना डोळे त्या पडत्या पाण्याला lock झाल्यासारखे वाटले .... मग लक्षात आलं त्या कसही पडणाया पाण्यालाही १ pattern आहे ... म्हणजे १खादी गोष्ट खुप irregular झाली ना मग तिच्या irregularityलाही 1 pattern asato मग खरं random असं काही नसतंच का ? प्रत्येक गोष्ट ही कुठल्यातरी सुत्रात बांधलेली असते .. प्रत्येक गोष्टीला १ equation असतं i mean everything in this world is so tightly bound .. just like a perfect mathematical expression ... everything is so perfectly defined just like a crystal and as hard as crystal .. फ़क्त एवढंच की आपल्याला ते समजत नाही ... हा इथला निसर्ग ... लोकं .. त्यांची रहाणी culture .. economics ... सगळं १मेकांशी पक्कं बांधलेलं .... १ गणितच ... गणित म्हणजे साक्षात देव .. मन आणि मेंदू , creativity and logic, economics and culture ....... आणि हो संगीतही .
तिकडे ते पाणी असं पडत होतं आणि इकडे हे विचार डोक्यात पडत होते ... तेवढ्या मित्राची हाक ऐकु आली ... बघितलं तर बर्यापैकी अंधार पडायला लागला होता .. मग पुर्ण काळोख पडेपर्यंत तसेच पडुन राहिलो .... अंधार पडल्यावर मग वरती परत जायला सुरुवात केली ... माझा मित्र वजनदार असल्यानी त्याला बराच त्रास व्हायला लागला ... मध्ये मध्ये थांबत काजवे पहात चढत होतो ... मित्र मला म्हणाला हे काजवे आहेत का मला दमल्यामुळे तसं वाटतंय ते कळत नाहिये .. त्यात माझ्या डोक्यात आलेले विचार सांगितले ... त्यानी मला मनातुन बर्याच शिव्या दिल्या आणि म्हणाला मला बहुतेक श्वास घेता येत नाहिये... असं करत करत वर पोचलो .. तोपर्यंत गर्दी संपुन सगळं शांत झालं होतं ... मग तिथे थोडं खाउन hostelवर परतलो.
मग रात्री अवतिभोवती १ छोटीशी १ चक्कर मारुन परतलो आणि सुखशय्येवर विराजमान झालो.

दि.१-१०-०६

मला नेहमीप्रमाणे सकाळी लवकर जाग आली तेव्हा ६:०० वाजले होते ... मग त्या धुडाला उठवलं आणि तयार झालो ... परत जोग फ़ॊल्स जवळच्या १ hotelमध्ये खाउन मुरुडेश्वरच्या रस्त्याला लागलो ... हा रस्ता म्हणजे सगळे hair-pin bends आणि रस्ताही १दम मस्तं ... त्या रस्त्यावरुन जाताना कुठे फोटो काढु आणि कुठे नको असं झालं ..... ह्या रस्त्यावर मग थोड्या वेळानी जोरदार पाउस सुरु झाला .... माझ्याकडल्या जर्किन्मुळे वाचलो ... १का ठिकाणी शरावती नदीचं पात्र दिसंत होतं.
लहानपणी सगळ्यांचं आवडतं आणि सोप्पं चित्र असतं ना .. म्हणजे २ डोंगर मध्ये नदी ... आणि तिथुन उगवणारा सुर्य ते चित्र अगदी हुबेहुब दिसत होतं .. मग तिथे थांबुन फोटो काढला त्या नदीचा .... फोटो analog cameraनी काढलेत त्यामुळे इथे त्याचा एवढा effect जाणवत नाहिये... तिथुन मग होन्नवर ला गेलो ... तिथे डाविकडे वळलं की तो रस्ता मुरुडेश्वरकडे जातो आणि उजवीकडे वळलं तर तो कारवार-गोव्याकडे जातो (पुढच्या वेळी तिकडे ;-)) .. होन्नवरला पेट्रोल भरुन पुढे मुरुडेश्वरकडे निघालो .. हाच तो NH-17. होन्नवरमधुन बाहेर पडताना १ कि.मी.चा १ पुल लागतो तो शरावती नदी समुद्राला मिळते त्या खाडीवर आहे ..पण तिथे भरपुर पाउस असल्यामुळे फोटो न काढता पुढे गेलो ... मुरुडेश्वर ला जाताना बयाचदा १ बाजुला समुद्र आहे तो दिसतो. मुरुडेश्वरला पोचल्यावर तिथल्या मंदिरात न जाता बाहेरुनच नमस्कार केला ... आणि मग थोडावेळ समुद्राकाठी बसलो ... सामान कडेला ठेवुन पाण्यात जाणं शक्य नव्हतं .. मग मालप्याला जाउन असं स्वतःला समजावलं आणि मग hotelमध्ये गेलो. योगायोगाने माझी बहिण आणि तिचं मित्रमंडळ त्याच hotel मध्ये आलं होतं .. .. it was a gr8 surprise तिकडची भेटाभेटी उरकुन मालप्याच्या दिशेनी निघालो ... मालप्याला जाताना भटकळ नावाचं गाव लागतं तिथे १ मोठं gray market आहे .. तिथे चक्कर मारुन पुढे निघालो ... भटकळपासुन साधारण ३० कि.मी. वर मरवंथे नावाचा beach आहे .. त्याचं वैशिष्टय हे की तिथे १का बाजुला समुद्र आणि दुसया बाजुला नदी आहे आणि मध्ये फ़क्त १ काळाकुळकुळीत रस्ता ... cameraला wide angle lens असती तर त्याचा फोटो काढता आला असता ... तिथल्या बीचवर थोडावेळ बसुन पुढे निघालो.
पुढे रस्त्यावर मालपे लागतं ... मालप्याहुन st. mary's island ला जाता येतं .. रु.७० माणशी घेतात आणि तिकडे नेतात ... t.v. वर दाखवतात तसलं island ... अगदी छोटं ... लाटा नाहीत ... पोहण्यासारखा समुद्र ... कधी १दा बीचवर पोचुन त्या पाण्यात उडी मारतो असं झालं होतं .. पुढचा तासभर मग पाण्यामध्ये भिजत घातल्यासारखा तरंगत होतो .... मग वाळुनी माखलेले कपडे १कत्र करुन बोटीत बसुन परत आलो. तिथल्या १का hotel मध्ये अतिशय कमी काटे असलेला मासा खाल्ला .... सुरुवातीला घाबरत घाबरत खात होतो ... पण मग नंतर बिन्दिक्कत खाल्ला. आतापर्यंत संध्याकाळ होत आली होती .. मला संध्याकाळी गाडी चालवायला अजिबात आवडत नाही .. फ़ार concentration नी चालवावी लागते .. त्यात डोळ्यावर मोठ्या गाड्यांचे फ़्लॆश येत असतात.हेल्मेटच्या काचेमुळे तो प्रकाश scatter होतो आणि मग रस्ता जवळजवळ दिसतच नाही. हेल्मेट्ची काच उघदी ठेवुन चालवलं तर डोळ्यात असंख्य किडे जाणार ... मालपे ते उडुपी रस्ता ठिक आहे पण १दा उडुपी cross केलं की अतिशय घाण रस्त्याला सुरुवात होते.मग पुढे मंगलोर पर्यंतचं अंतर शुन्य कि.मी. च्या स्पीडनी जावं लागतं.हा साधारण ३०-४० कि.मी चा पट्टा शरिरातल्या सगळ्या हाडांची उजळणी करुन देतो.मंगलोर मध्ये पोचेपर्यंत गाडीचम सीट दगडाचं आहे असं वाटायला लागलं होतं आणि कधी १दा चांगला रस्त येइल असं झालं रात्री ८च्या आसपास ते मंगलोर आलं ... मग मात्र सिमेंट्चा रस्ता सुरु झाला आणि अगदी परिकथेतल्या ढगातुन चाललो आहे असं वाटलं.मंगलोरमध्ये त्या वेळेला दसयाची मिरवणुक चालु होती. माझ्या roommateचा मित्र मंगलोर मध्ये राहतो .. रात्री त्याच्या घरी गेलो ... स्वच्छ आंघोळ केली आणि मग जेवायला बाहेर पडलो ... आणि आश्चर्य म्हणजे तो रिक्शावाला आम्हाला जिथे जायचंय त्याला लगेच हो म्हणाला ... ह्यातलं आश्चर्य बंगलोरला आल्याशिवाय कळायचं नाही. जेवताना माझे डोळे मिटायला लागले होते ... कालच्या ४२० कि.मी. नी जेवढी दमछाक झाली नव्हती त्यापेक्शा जास्त आजच्या ह्या खराब रस्त्यामुळे झाली होती. घरी येउन दुसया दिवशीचं planning केलं आणि swiched off ......

दि. २-१०-०६

सकळी उठलो ... मंगलोर ते साकलेशपुर रस्ता खराब आहे. तसं असेल तर लवकर निघणं जरुरी होतं.त्यामुळे बेकाल fort ला जायचं cancel केलं. सकाळी कद्री मंदीरात गेलो. हे मंदीर मला प्रचंड आवडलं. प्रचंड आवार ... स्वच्छ आणि आजुबाजुला दाट झाडी. तिथे दर्शन घेउन st.aloysius church मध्ये गेलो. आणखीन काही explore करण्यासाठी वेळ नव्हता. मग परतीच्या रस्त्याला लागलो. हा रस्ता अघोरी आहे. म्हणजे पुण्यातले सगळे खराब रस्ते जोडुन १ जास्तीत जास्त लांबीचा रस्ता तयार केला तर जो रस्ता तयार होइल तो असा असु शकेल. मंगलोर ते साकलेश्पुर हा १२८ कि.मी. चा रस्ता म्हणजे स्वर्गाच्या वाटेपेक्शा अवघड असेल. रस्त्यामध्ये २ फ़ुटाचे खड्डे रस्त्यावरुन पाणी वाहतय ... आणि त्या घाटात १०-१५ पेट्रोल tanker चालले आहेत असं भीषण चित्र दिसत होतं ... ह्या रस्त्यानी पाठ आणि गाडीच्या सीट ला लागणारा भाग ह्याची वाताहात झाली होती ... मित्र
जिथे कुठे थांबायचा तिथे लगेच उभा रहायचा ... मग मी त्याला म्हटलं अरे "अरे ये गंदगी खतम होतेही आराम से किसी जगह पर रुकेंगे" ह्यावर त्याचं उत्तर " अरे खतम तो होगाही लेकिन पेहले ये खतम होगा या हम ?? " सुदैवानी तो संपला ... आणि साकलेश्पुर च्या पुढे परत मस्त रस्ता सुरु होतो १दम मख्ख्नन की तरह ... तिथे १का coffee plantationच्या बाजुला थांबलो आणि सगळ्या भागांना आराम करु दिला. पुढे हसन जवळ १का ढाब्यावर बसुन जेवलो. तिथे थोडा पाउस झाला होत. जेवल्यावर त्या रस्त्याने परत निघालो .... रस्ता पावसामुळे गुळगुळीत झाला होता मग काय murphy's law " if anything can happen it will happen" आमच्यासमोरची इन्डिका अचानक थांबली .. आणि आमची गाडी स्लिप झाली ... सुदैवानी आम्हाला खरचटलंही नाही. knee cap आणि जर्किन मुळे काही झालं नाही. १ लोच्या झाला ... ब्रेक च्या तिथलं फ़ुटरेस्ट तुटलं .. मग पुढच्या प्रवासात पाय तिरका ठेवुन ठेवुन दुखायला लागला. शेवटी रात्री ८ वाजता बंगलोरात पोचलो ... घरी गरम पाण्यानी मस्तं आंघोळ केली .. आणि नवरत्न तेल लावुन गाढ झोपलो .

आता पुढच्या ट्रिप ला गाडी रेल्वेत टाकुन हिमाचल ला न्यायची आणि तिकडचा भाग फ़िरायचा किंवा मग मध्यप्रदेशात रणथंभोर,भेडाघाट वगैरे बघायचं ...............