Thursday, October 25, 2007

सीमोल्लंघन .........

२०-१०-२००७
कधी परिक्षा कधी काम कधी आणखीन काही .. त्या M.S.मुळे सगळेच्या सगळे weekends असेच गेले त्यामुळे august झालेल्या ट्रिपनंतर कुठलीही ट्रिप झाली नव्हती आणि आता आता ते M.S. लवकर संपवुन खरच आवडणा-या गोष्टीना वेळ द्यायला पाहिजे असं जास्तं वाटायला लागलं.
लोकं हौसेनी एवढम कसं काय शिकु शकतात कोण
जाणे. असल्या लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे. पण कधी कधी ह्याना पकडुन बडवावं वाटतं ...
ह्या लोकांमुळे आम्हाला एवढी मरमर करावी लागते :D तर ते असो .... तो काही मह्त्वाचा मुद्दा नाही आणि मी काही ह्याला फ़ारसा भावही देत नाही. ह्या सगळ्या जंजाळातु
न जरा बाहेर पडावं म्हणुन दस-याची सुटी वापरावी असं आधीच ठरवलं होतं. तसं मित्रालाही सांगितलं त्यानेही मग नेटवर काही जायची ठिकाणं सापडतात का ते शोधायाला सुरु केलं ..
पण त्या मास्तरांना २० ऒक्ट.च्या शनिवारीही क्लास घ्यायची हुक्की आली .. झालं सगळ्याचा पोपट होणार असं दिसायला लागलं घरी येउन रुपालाही सांगितलं .. रुपा म्हणजे रूम पार्टनर :D .. तोही वैतागला .. "साले तुने धोका दिया वगैरे .." आणि दुस-याच दिवशी त्याच्या मॆनेजरनीही त्याला वीकेंडला कामाला यावं लागेल असं सांगितलं ... झालं .... मग काय करणार .. विचार करणं सोडलं . आणि अहो आश्चर्य !!
गुरुवारी मला मेल आला "no class this saturday" बास मी वेडा होणार असं वाटलं .. श्रीनाथलाही office मध्ये जावं लागणार नव्हतं वर त्याला शुक्रवारी सुटी मिळाली .. पठ्ठ्या लगेच जाउन 52 weekends around bangalore विकत घेउन आला. त
्यानी आधीच नेट्वर १ लिन्क बघुन ठेवली होती .. त्यात कुठलातरी कब्बलदुर्ग आणि काय काय होतं जे proper bangaloriansनासुद्धा माहित नव्हतं. त्याची माहिती मी आणली घरी पण त्या पुस्तकात बघीतल्यावर आणखीनही काही ठिकाणं समजली त्यामुळे रात्रीपर्यंत काही ठरलंच नाही कुठे जायचं .. then i told him boss lets get up in the morning n get on to the road n let bikes decide where to go even if both the bikes decide on to different roots we'll go ..that kind of desperation we had ..so to go out was a must ..
झोपायच्या आधी प्लान बनवला ..कब्बलदुर्ग-शिवनसम
ुद्र-तलकाड-सोमनाथपुर आणि परत. अंतर फ़ारसं नव्हतं .. आणि रात्री झोपायलाही उशिर झाला होता म्हणुन सकाळी जर उशिरा उठलो आणि साधारण ६:३० ला घरातुन बाहेर पडलो .. गेले ४-५ दिवस बंगलोरमध्ये रोज पाउस पडत होता त्यामुळे हवा अतिशय मस्तं होती. आजुबाजुला सगळं हिरवंगार होतंच त्यात परत दस-याचे दिवस असल्यामुळे वातावरणात उगाचंच का्हीतरी मस्तं factor होता. लोकाना विचारत विचारत कनकपुरा रोड गाठला .. जवळ कब्बलदुर्गाकडे जायचा नकाशा घेतला होताच.
पण हे कब्बलदुर्ग ठिकाण कुठल्यातरी कानडी खेड्यात असणार होतं आणि इथे आमच्या कानडीचा कस लागणार होता.ट्रीपची काहीही तयारी केली नसल्यामुळे जवळ पाण्याच
्या बाटलीशिवाय काही नव्हतं .. आणि आमची समजुत अशी की कुठल्याही खेड्यात इडलीतरी नक्कीच मिळेल . आकाशात ब-यापैकी ढग होते. काही काही ढग असेच फ़िरत होते उगाच १टे ... आणि ते पाहताना मला ते बगळ्यांची माळफ़ुले गाणं ८वलं ..
त्यात ती ओळ आहे न 'ओल्या रानात फ़ुले उन अभ्रकाचे , मनकवडा घन घुमतो अजुन डोंगरात .. ' तर ह्या ओळीमुळे .. काय भारी लिहीतात लोकं !! हे गाणं कोणी लिहिलय मुळ गायक कोण काही माहित नाही .. मी हे गाणं राहुल देशपांडेचं आणि शंकर महादेवननी गायलेलं ऎकलय .. सुरुवातीला ऎकलं तेव्हा अर्थच कळेना ... हळु हळु ऎकल्यावर काही काही गोष्टी कळाल्या .. जर हे नुसतं कागदावर लिहुन दिलं असतं तर समजणं काय शक्य होतं !! ह्रुदयनाथ मंगेशकरांनी जर त्यांची गाणी बनवली नसती तर खानोलकर किंवा ग्रेस हे अगम्यच राहिले असते अर्थात माझ्यासाठी .. काही मोठी लोकं फ़ार अवघड काहीतरी लिहितात आणि काही लोकं एवढं सोपं करुन लिहितात की ते सामन्यांसाठी totally अशक्यच असतं जसं ते प्रसिद्ध "minds the train and trains the mind" वाक्य .. काहिही अगदी .. मध्ये असंच १ भारी वाक्य कळालं ..
संघाचे हुद्दार म्हणुन कोणीतरी मोठे कार्यकर्ते होते आणि त्यांनी सशस्त्र क्रांती आणि नि:शस्त्र क्रांती ह्यातला फ़रक समजावुन सांगितला १काच वाक्यात.. म्हणजे थोडक्यात जहाल मतवादी आणि अहिंसावादी ह्यांच्यात
ला .." सशस्त्र क्रांतीनी थोड्या लोकांकडुन फ़ार त्यागाची अपेक्षा केली आणि नि:शस्त्र क्रांतीनी फ़ार लोकांकडुन थोड्या त्यागाची अपेक्षा केली" किती सोपं आणि सहज .. तसं १ पुस्तक वाचलं होतं मध्ये हर्षदनी दिलेलं ..साता उत्तराची कहाणी म्हणुन कोणाचं ते ८वत नाही नक्की पण त्यात सात मित्र वेग-वेगळ्या तत्वांना follow करणारे .. communist,गांधीवादी, संघवाला आणि इतर त्या लेखकांनी सगळ्यांचे विचार एवढे व्यवस्थीत सांगितलेत कि माझ्यासारख्याला सगळ्यांचीच मत पटली म्हणजे त्या लेखकाला हे सगळं किती clear होतं .... ooooo हे विषयांतर नाही हे सगळं गाडी चालवताना डोक्यात चालु होतं .. शेवटी आम्ही त्या कनक्पुरा गावात पोचलो साधारण ५५ कि.मी .वर आहे बंगलोर पासुन. तिथे खाण्याजोगं १कही hotel मिळालं नाही .. प्रचंड भुक लागली होती आणि जवळ पाण्याशिवाय काहीही नव्हतं. मग काय तिथुन पुढे काहितरी मिळेल अशी आशा करत हलगुर नावाच्या गावापाशी आलो. हे गाव साधारण १० किमी आहे कनकपुरपासुन.हलगुर गावापाशी आलं कि कब्बल गावाला जायला उजवीकडे वळावं लागतं. पुढे ५किमीवर ते गाव आहे आणि तिथेच त्या गावाची देवी कब्बलम्माचं मंदीर आहे. त्या मंदीराच्या अलिकडे डाव्या बाजुला १ रस्ता आहे त्या रस्त्यानी पुढे गेलं कि हा कब्बलदुर्ग दिसतो. मग तिथेच गाडी लावुन आम्ही पुढे निघालो . ह्य रुपा(श्रीनाथ)ला गेले २-३ दिवस सर्दीचा त्रास होत होता ..त्यानी आधी डोंगर बघुन किती उंच आहे वगैरे सुरुवात केली .. त्याचा हा video. हा डोंगर म्हणजे १ प्रचंड मोठी शिळा आहे ..
सुरुवातीला साधी चढण आहे पण पुढे नुस्ता कातळ आहे त्यात पाय-या खोदल्यासारखं केलं आहे .. पावसाळ्यात जाणं अवघड आहे. वर पोचता पोचता हवा tight झाली होती .. आणि श्रीनाथ मला शिव्या घालत होता .. हळु हळु चाल म्हणुन .. सव्वा तासानी आम्ही वर पोचलो. वरतुन खालचा परिसर मस्तं दिसत होता .. हिरव्या रंगाच्या सगळ्या शेड्स .. ते काही कॆमेरात पकडायला जमलं नाही. वरती १ छानसं देउळ आहे त्याचा रंग बघुन ते मंदीर असेलसं वाट्लं नाही पण महादेवाचं मंदीर होतं.
तिकडे नमस्कार करुन मग त्या मंदीराच्या बाजुला १५-२० मिनिटं पडीक होतो. खालच्या गावातुन घेतलेली केळी वगैरे खाऊन खाली उतरायला सुरुवात केली. उतरताना ब-यापैकी कमी वेळात खाली पोचलो तिथे आमच्या गाड्या वाट बघत बसल्या होत्या. गाड्या काढुन आम्ही शिवनसमुद्रच्या दिशेनी निघालो .. आता पावसाची भुरभ्रुर सुरु झाली होती आणि त्यात रस्ता खराब आणखी खराब असा होत गेला .. दुपारी १:३० च्या सुमारास आम्ही शिवनसमुद्रला पोचलो. इथे २ धबधबे आहेत गगनचुक्की आणि बारचुक्की. आम्ही आधी गगनचुक्कीच्या बाुला गेलो.तिथे गेल्यावर अगदी धन्यधन्य झाल्यासारखं वाटलं ते पाणी पाहुन नाही तिथे १ चांगलं hotel होतं आणि एव्हाना आम्हाला वाईट्ट भुक लागली होती. धबधबा आपण का आलोय काहीही न समजण्याएवढी भुक लागली होती .. आत जाउन व्यवस्थित order दिली तिथे जेवल्यावर मग जरा बाकीच्या गोष्टींकडे लक्षं जायला लागलं म्हणजे तिथे आणखीन group आलेला आहे ..त्यात चांगली दिसणारी मुलगी आहे आणि अर्र्रर्र .. ती चक्क मराठी आहे वगैरे वगैरे ... मग लक्षं धबधब्याकडे गेलं आणि वा वा वा ...
२दा jog fallsला जाउन जे दिसलं नाही ते इथे दिसलं .... धो
धो पाणी ..ferociously diving into that valley ... तिथे कुंपण टाकुन खाली न जाण्याचे बरेच संदेश लावलेले आहेत.आम्ही ते पाळले म्हणजे पाळणारच .. वाह्यातपण नाही करायचा कुठेही. आम्ही ज्या बाजुनी धबधब्याकडे बघत होतो त्याच्या बरोब्बर विरुद्ध बाजुला पाउस पडत होता आणि बारचुक्की धबधब्याकडे जाण्यासाठी आम्हाला त्याच दिशेला जायचं होतं. तिकडे बराच वेळ आम्ही धबधबा बघत , त्या धबधब्याचा आणि स्वत:चा फोटो १त्र काढुन घेणारे लोक ... हे सगळं बाजुला सोडुन कवठाच्या आतला गर काढणारा माणुस .. हा माणुस जवळ जवळ पाउण तास त्या कवठाशी खेळत बसला होता आम्ही जाइपर्यंत त्याचं ते कवठ प्रकरण चालुच होतं. त्यात काही चिंधीचोर फ़िल्मी लोक होतेच goggle वगैरे घालुन पोझ देउन फोटो काढुन घेणारे लोक ..एवढं मस्तं दिसणारं द्रुष्य स्वत: मध्ये येउन घाण करतोय हे समजतंच नाही ह्या लोकाना .. किती हीन असावं १खाद्यानी श्या .. पण हे सगळं नंतर .. तिथे असताना असलं काहीच वाटलं नाहे उलट we were enjoying those ppl out there.
as we were gawking at those guys .. they also became conscious and went off so easy for us :) . तिथुन निघुन आम्ही १२किमी वर असणा-या बारचुक्कीपाशी गेलो. हा बारचुककी जिथुन आधीचा धबधबा दिसतो तिथुनही दिसतो पण इथुन बराच जवळ आहे आणि ह्याला कुंपण वगैरे काही नाहिये. इथे पोचेपर्यंत जोरदार पाउस सुरु होता .. पण जर्किनमुळे आम्ही वाचालो आणि जिथे स
गळी लोकं आसरा शोधत पळत होती तिथे आम्ही गप्पा मारत उभे होतो आरामात. इथे पाणी अगदी जवळुन पहायला मिळालं. एवढं खुंखॊर दिसत होतं ना ते पाणी पुर्ण ताकदीनं वाहणारं .. खालचा दगड फोडुन टाकण्यासाठी त्यावर आपटतय असं वाटणारं.पण ह्या धबधब्याच्या अगदी जवळ १ दर्गा आहे आणि तिथे लोकांनी एवढी प्रचंड घाण केली आहे .. त्या पावसामुळे आणखीनच घाण झाली होती. तिकडे दुर्लक्ष करुन पाण्यापाशी जाउन पोचलो.पाउस सम्पल्यावर camera बाहेर काढुन थोडेसे फोटो काढले आणि मुक्कामाच्या शोधात निघालो. तिथे चौकशी केल्यावर कळलं की कोळ्ळेगलमध्येच मुक्काम करता येइल. मग तिथुन २५ किमीवरच्या कोळ्ळेगल कडे निघालो ... वाटेत भाताचं १ मस्तं हिरवं गार शेत होतं आणि लांब कुठेतरी ढग अगदी खाली आले होते आणि बरसत होते ..अगदी नभ उतरु आलं गाण्यासाठी महानोरांना वाटलं असेल तसं. तिथेच जवळ काही नारळाची झाडं १कटीच उभी होती. मस्तं दिसत होती.
हा camera digital असल्यानी फोटो तेवढे भारी नाही आलेत .. हा साधा poin
t n shoot camera होता. पण लहान आकाराचा असल्यानी बरंच काय काय करता आलं. म्हणजे छोटे छोटे videos वगैरे घेता आले .फोटो वगैरे काढत आम्ही ६:३० च्या सुमारास कोळ्ळेगलला पोचलो .. तिथे bus stand जवळच्या १का lodgeवर १ खोली घेतली .. आता दुसरा काही optionach nawhataa ..नाहीतर उघड्यावर झोपलो असतो पण बस स्टॆंडजवळचं lodge नको.generally असली सगळी hotels दारु आणि cigaretteच्या धुरानी भरलेली असतात .. पण तेवढं घाण नव्हतं. खोलीत जाउन त्या गादीवर झोपल्यावर थेट स्वर्गातल्या कुठल्यातरी सुंदर ढगांच्या बिछान्यावर झोपलो आहेत असम वाटलं. जे झोपलो ते direct १०लाच उठलो.
उठुन खाली आलो आणि खाण्याच्या शोधात बाहेर पडलो त्या परिसरात आम्हाला १२ तरी दारुची दुकानं दिसली असतील पण १ जेवणाखाण्याचं hotel दिसेल तर शपथ. रात्रीचं जेवणही मग बि
स्किटावरच झालं.... बिस्किटं वगैरे घेउन परत आलो तर lodgeवर T20 cricket match चालु होती ती बघीतली आणि आपण जिंकलोही. खोलीत जाउन बिस्किटं खाऊन पाणी पिउन झोपलो.

२१-१०-२००७

आज दसरा . तलकाड आणि सोमनथपुर बघुन लवकर mysore road
ला लागायचं म्हणजे बंगलोरला जाताना traffic कमी असेल असं planning करुन करुन आम्ही लवकर निघलो. सकाळी साधारण ६च्या सुमारास उठलो. सकाळी आम्ही आधी तलकाडला जाउन मग सोमनाथपुरला जायचं ठरवलं. सकाळी lodgeवाल्याला रस्ता विचारला आणि त्या रस्त्यानी निघालो .. थोडं पुढे गेल्यावर परत १दा कोणाला तरी विचारुन पहावं म्हणुन विचारलं आणि त्या बाबानी वेगळाच म्हणजे आम्हाला जो वाटत होता तोच रस्ता सांगितला. मग परत माघारी वळुन शिवनसमुद्रच्या दिशेला निघालो. बारचुक्कीच्या जवळ १ पुल आहे तो पुल ओलांडला की डाविकडे वळावं लागतं तलकाड कडे जायला. हा रस्ता अतिशय खराब आहे. गाडी २०किमी च्यावर जाउच शकणार नाही असा. साधारण तासाभरानी तलकाडला पोचलो. ही जाग म्हणजे समुद्राकाठी असते ना तशी आहे .. तशीच सुरुची झाडं समुद्राकाठी असते तसली वाळु आहे सगळीकडे. काजुची झाडही पाहिली मी तिथे .
तिथे पोचल्यावर २-३ लोकानी विचारलं guide पाहिजे का म्हणुन त्यानी
विचारलं म्हणुन आम्ही उगाच नाही म्हणालो .. काही खास कारण नव्हतं नाही म्हणायचं उगीचच .. generally कुठल्याही नविन ठिकाणी गेलो तर guide हा घेतोच मी बरोबर ..पण इथे नाही म्हणालो .. actual मंदीरं जिथे आहेत तिकडे जात असताना १का लहान मुलानी lift मागितली. त्याला घेउन नदीचा काठ जिथे आहे तिथे गेलो. गाडी वगैरे लावली. मग त्यानी विचारलं guide पाहिजे का ? म्हणजे लिफ़्ट हा वाह्यातपणा होता तर .. मग त्याच्याकडे दुर्लक्श करुन आम्ही इकडे तिकडे भटकलो .. तिथे काही भग्न अवशेश होते .. आणि आजुबाजुला दाट झाडी ... हे सगळ थेत congo पुस्तकातल्या झिंज च्या खाणीसारखं वाटणारं होतं .. परत गाडीपाशी आलो तर हा मुलगा अजुनही तिथेच होता .. मग त्याला टाळायला म्हणुन मी आम्हाला कानडी येत नाही सांगितलं ..पण पोरगं मस्तं होतं .. १दम चुणचुणीत .. त्याला विचारलं तर तो ५० रुपयात सगळं दाखवायला तयार झाला .. तो कानडीत सांगणार आणि आम्ही ते समजुन घेणार .. आम्हाला तेव्हा जाम भुक लागली होती पण guide साहेब म्हणाले आधी सगळं बघुन घ्या आणि मग breakfast .. मग काय बरं म्हणालो .. हा पोरगा प्रचंड प्रयत्न करुन सांगत होता .. आमचं डंब शराड्स चालु होत किंवा wats the good word का काय म्हणतात ते .. अगदी action करुन वगैरे ..इथली मंदीरं अगदी recently सापडलेली आहेत आणि बर्याच ठिकाणी अजुन excavation चालु आहे .. सगळी मंदीरं त्यामुळे जमीनीच्या खाली .. तो कुस्ती खेळायचा आखाडा असतो ना तशी. १का ठिकाणी जमीनखालचे आवशेष काढुन मंदीर पुन्हा बांधत आहेत तिथे जायला परवानगी नाही पण वरुन ते सगळं बघता येतं.हे वरचं चित्र त्याचंच आहे ..
सगळी मंदीरं बघुन झाल्यावर खाण्याच्या ठिकाणी गेलो .. आणि २ बिस्कीटांच्या जेवणानंतर आज गरम गरम वाफ़ाळलेली इडली बघुन कोण आनंद झाला .. फ़क्त दहा रुपयात ४ इडल्या भरपुर चटणी आणि दोन भजी ... प्रचंड समाधान उराशी घेउन २ जीव पुढच्या प्रवासाला निघाले.
पुढचं ठिकाण होतं सोमनाथपुर. हे मंदीर होयसाळा architecture चा नमुना आहे ... अतिश
य सुस्थितीत आहे आणि तसं maintainही केलं आहे.अजिंठा वेरुळ हंपी सगळीकडच्या मंदीरांमध्ये जे अतिशय नाजुक असं कोरीव काम आहे ते उन वारा पावसामुळे smooth झालं आहे. पण इथल्या प्रत्येक कलाकृतीच्या edges १दम शार्प आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथल्या कारागिरांनी त्यांची नावं तिथे कोरली आहेत तारखेसकट. हे असं दुसरीकडे मी कुठेच पाहिलं नव्हतं. खरतंर मंदीर पाहताना हे माझ्या लक्षातही आलं नाही .. पण मंदीरातुन बाहेर येताना पुरातत्व खात्यानी लावलेला board वाचताना ते लक्षात आलं हेही नसे थोडके ... एवढं intricate काम सुस्थितीत असणारं मी बघितलेलं हे पहिलं मंदीर. अगदी जरुर बघावं असं. मंदीर बघुन आम्ही मैसुरच्या दिशेनी निघालो .. सोमनाथपुर ते श्रीरंगपट्टण एवढं ३० किमी चं अंतर पार करायला आम्हाला १ तास लागला आणि १दा मैसुर रोडला लागल्यावर average स्पीड ७० च्या आसपास असतो :-) . वाटेत कामतांच्या हॊटेलवर खावं म्हणुन थांबलो तर तिथे प्रचंड गर्दी होती, सगळ्या लोकाना घरी खायला मिळत नसल्यासारखी. hotel मध्ये bachelor लोकाना preferance द्यायचा नियम काढला पाहिजे .. सणाच्या दिवशी सहकुटुंब बाहेरचं खायला येणार्यांवर तर कारवाई करायला पाहिजे .. मग दुपारच्या जेवणाची आशा सोडुन बंगलोरच्या दिशेनी निघालो. संध्याकाळी तसही मायबोलीकर मंडळींबरोबर GTG होतं तेव्हा सगळी कसर भरुन काढु असा विचार करुन बंगलोर गाठलं .. एवढ्या पुर्ण ट्रिपमध्ये कुठेही नसेल एवढा मुसळधार पाउस घरापासुन २ किमी वर सुरु झाला आणि घरी जाइपर्यंत नखशिखांत भिजलो. त्या पावसालाही बहुतेक आम्ही दोन दिवस आंघोळ केली नाहिये ते कळलं असावं म्हणुन घरी पोचायच्या आतच त्यानी आम्हाला स्वच्छ केलं. घरी जाउन मस्तं गरम पाण्यानी आंघोळ केली. तोपर्यंत मित्रांचे फोन यायला लागले होते. मग कपडे करुन मित्राबरोबर श्री मिठाईमध्ये गेलो भरपुर श्रीखंड आणलं आणि GTG साठी मायबोलीकरणीच्या घरी गेलो . तिथे तीनी पुरणपोळ्या, पुलाव, पु-या असं बरंच काय काय केलं होतं .. ते खाउन नंतर व्यवस्थित पान खाउन साधारण ११ ला घरी आलो .. घरी पोचेपर्यंत डोळे जवळ जवळ मिटले. पुढचं काही ८वत नाही :-) ....
one more of the nice trips !! oxygen भरुन आल्यासारखं वाटलं अगदी .. आता decemberपर्यंत बघायला नको :-) ..