Me, Vibhor and Vijay |
ह्या ठिकाणी काहीतरी लिहीण्याची संधी किंवा वेळ ही तब्बल ३ वर्षांनी येतीये :-), चालायचंच. गेली ३ वर्षे आयुष्यातल्या मोठ्या बदलाशी हातमिळवणी करण्यात गेली. Considering the total life span this seems negligible but as of now it is significant. मध्ये १-२ दा छोट्या छोट्या ट्रिप्स केल्याही पण लिहिण्याजोगं असं फारसं काही नव्हतं त्यामध्ये आणि माझ्यामते त्या ट्रिप्स नव्हत्याच. ट्रेकला जाउन तर तब्बल ६ वर्ष झाली आहेत. ह्यासगळ्यामुळे जीवाची नुसती घालमेल चालु होती. छोट्याश्या कारणाने राग अनावर होणे. रस्त्यावर at least १कातरी cab, rickshawवाल्याशी रोज भांडणे असं सुरु झाल्यावर मग वाटलं कि लवकरात् लवकर १ ट्रेक् किंवा ट्रिप झालीच पाहिजे नाहितर मानसिक संतुलन बिघडण्याची दाट शक्यता आहे. दिवाळीच्यावेळी मस्तं चान्स होता पण बरोबर येण्यासाठी कोणीही तयार नव्हतं आणि उगाच एकटं कुठेही जायचं नाही अशी सक्त ताकिद घरातील सर्व वरिष्ठांनी( अधिकाराने) दिल्याने दगडासारखा घरात बसुन होतो. यावेळी मग लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत जी ट्रिक काम करायची तीच ट्रिक कामी आली. तेव्हा औरंगाबदच्या कडक उन्हाळ्यात घरातुन दुपारी बाहेर खेळायची सरळ सरळ परवानगी मिळत नसे .. त्यात परत दुपारी झोप येण्याचा संबंध नसायचा आणि बैठ्या खेळांशी आपलं आधीपासुनच वाकडं.. मग आईच्या डोक्याशी भुणभुण करायची .. आई रसना पिउ का ? असं दर ५ मिनीटानी विचारणे , भिंतीवर ball मारत बसणे , माळ्यावर चढुन काहीतरी खुडबुड करणे .. मग आपोआप मागच्या अंगणात खेळायला मिळायचं .. तसंच यावेळीही मी बराच त्रासलो होतो आणि मी जाहीर केलं की कोणी येवो न येवो मला माहित नाही मी Pondicherry जाणार. So I had decided to go. I asked few of my friends who I thought may possibly come with me to pondy and each of them had some reason for not coming as it used to be when I was a kid. I got my bike serviced. I didn't use bullet for past 3 months as I didn't want to waste petrol and needed that morally positive feeling. The actual plan was to start using cycle once a week before this trip but the knee didn't recover as fast as I optimistically expected. Now you know how desperate I was for this road trip. I started gathering all the info about this old french colony(Pondicherry) where French is still an official language. After a little googling and the route map I was ready. निघायच्या आदल्यादिवशी आमचे लखनवी नवाब फोन करुन विचारातात " सुना तुम Pondy जा रहे हो" ह्या माणसाला मी १ लाख दिवस आधी मेल पाठवला होता पण हे नवाब ई-मेलवर discussion करत नाहीत.. ह्याचा परत रुबाब .. उत्तरेच्या लोकांची ही १ गोष्ट भारी असते .. त्यांच्यामध्ये जन्मजातच ही "अकड" असते आता हा मनुष्य कधीकाळी roommate होता त्यामुळे मला त्याची सवय झाली होती. फोनवर साहेब म्हणाले " मेरा लगभग ८८% final है" probably his 88% is equivalent of Barney Stinsen's 83%. अजुन एक कानडीसाहेब म्हणाले "addy बाई वैसे मै भी आ सकता हूं" त्याला थोडं brainwash करुन तयार केलं .. अशा त-हेने ३ लोकं अचानक जमा झाली मी, विभोर(नवाब) आणि विजय . शनिवार २-०४-२०११ ला सकाळी ५ वाजता घरातुन बाहेर पडायचं नक्की झालं.
शनिवार ०२-०४-२०११
सकाळी ४:१५ उठलो आणि नवाबसाहेबसुधा जागे झाले. विजयला फोन केला .. ह्या साहेबाना नुकतीच enlightenment झाली असल्याने ते Gym-protein supplement वरुन प्राणायम आणि meditation अश्य़ा सलमान खान ते बाबा रामदेव ह्या प्रवासात होते. नवाबांना चहाशिवाय सकाळची ध्यानधारणा करता येत नव्हती .. थोडक्यात सकाळी उशीर होणार हे नक्की झाल्याने .. मी माझ्या नेहेमीच्या समयबद्ध मानसिकतेत राहुन चिडचिड करण्याऎवजी शांतपणे जे जे होइल ते ते पहावे ह्या mode मध्ये शिरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मला सकाळी सकाळी चहा मिळाला आणि शिवाय उपाशीपोटी कसं निघायचं ह्या भितीने नवाबांनी तयार केलेले corn-flakes सुधा मिळाले. विजय सकाळी ५ ला विभोरकडे पोचला मीही तयार होउन बसलो होतो विभोरच्या तयारीला अजुन काही(?) वेळ लागणार होता. मग काय विजयने आल्या आल्या TV लावला आणि सकाळी सकळी मोठ्या आवाजात TV लावुन विभोर ला ह्या apt.मधुन कसे बाहेर काढण्यात येइल ह्याचा प्रयत्न सुरु केला.. मग friendsचा १ अख्खा एपिसोड झाल्यावर finally घरातुन बाहेर पडलो. एव्हाना ५:४५ झाले होते. Trip meter was set and we started towards Hosur road. The newly constructed Hosur road is approx. 12kms long flyover. So once we were on that there was no need to slow down until we reached the toll booth at the end. Vijay was the first to reach the booth, he asked the person on the window to charge for all 3 of us. He took change and moved ahead .. behind him vibhor also started but gate closed and he dashed opened the gate .. and suddenly the alarm started ringing and the guy collecting money shouted "catch him" .. we all were clueless .. what's happening .. I was at the window i told him that Vijay has paid for 3 of us .. he said "no .. only 1 .." this dumb bihari had charged for only one .. I asked him to charge for two(me n vibhor) of us .. but he kept shouting at Vibhor and saying उसे पकडो .. उसने पैसा नही दिया ... and he did the same thing again .. he gave me ticket for 1 ..मग माझं डोकं सरकलं ...गाडीवरुन उतरुन त्याला "सर्व" प्रकारे झाडलं ... idiocracyत दाखवल्याप्रमाणे जगाचा avg. IQ खरोखरच कमी होत असल्याचं दिवसेंदिवस प्रकर्षाने जाणवायला लागलंय. सकाळी सकाळी ईसापच्या गोष्टीप्रमाणे लोक अक्कल परसाकडेला सोडुन येतात कि काय कुणास ठाउक. Finally matter sort out करुन आम्ही पुढे निघालो. निघताना विजय म्हणाला "addy अपना दिमाग इतना गरम नही करने का सुबह सुबह". मीही स्वत:ला असं ब-याचदा समजवायचा प्रयत्न करतो.. but I always fail to do this. आपल्या इथल्या जवळ जवळ सर्व लोकांना मिळालेला हा वाईट्ट शाप आहे "तेवढ्यानी काय होतं !!" .. जरा wrong sideनी गाडी चालवली तर काय होतं .. 2मि. उशिर झाल्यानी काय होतं .. १०रु. ची लाच घेतल्यानी काय होतं... १ दिवस work from home सांगुन काम न केल्यानी काय होतं ... लहानसा बग आहे .. नंतर फ़िक्स करु .. छोटसं फ़िचर आहे .. नंतर चेक करु .. का गोष्टी perfectly करत नाहीत ... हा "चलता है" नावाचा ढिसाळपणा आणि कामचुकारपणा का ? we get to see this stuff everywhere .. even in so called white caller and educated people .... जोपर्यंत हि लोकं company मध्ये असतात तोवर उगाच खोटं खोटं दाक्षिण्य दाखवत असतात .. लिफ़्टमध्ये आधी पुढे जाउ देणे.. बाटलीत पाणी भरत असतील तर बाजुला होऊन ग्लास भरु देणे वगैरे वगैरे पण हीच लोकं जेव्हा कंपनीच्या बाहेर जातात तेव्हा no parkingमध्ये गाडी लावणे .. बायको रस्त्याच्या कडेच्या दुकानात भाजी घेईतोवर रस्त्यात मध्येच गाडी उभी करणे वगैरे शांतपणे करत असतात. as rightly said by one of my friend, these are behaving like cultured people only because somebody who is wise has set the system for these people and these people just know how to follow it. had these ppl been raised in jungles they would have been living not unlike other animals. असो तर असं हे सकाळी सकाळी माझ्या डोक्यात वावटळ निर्माण करुन खिडकीवरले साहेब पुढच्या कामाला लागले होते आणि आम्हीही पुढे निघालो. सकाळचं थंड वारं, मोकळा चौपदरी रस्ता, उन्हाळा असुनही हिरवागार असलेला आजुबाजुचा परिसर ह्यामुळे डोकं शांत होत होतं. होसुरपर्यंतचा रस्ता हा ब-यापैकी रहदारी असलेला आहे. इथुन तमिळनाडु सुरु होतं. डाव्या उजव्या बाजुला वेगवेगळ्या कंपन्यांचे प्लांट्स आहेत. अशोक लेलॆंड आणि टीव्हीएस सुधा बघितल्यासारखं वाटतंय. ह्याच रस्त्यानी (NH-7) पुढे कृष्णगिरीपर्यंत जायचं. कृष्णगिरीच्या जवळ पोचायला लागल्यावर आजुबाजुला छोटे छोटे डोंगर दिसायला लागतात. आजपर्यंतच्या केलेल्या ट्रिप्सपैकी ही माझी पहिलीच ट्रिप होती ज्यात मी उगवत्या सुर्याच्या दिशेला निघालो होतो आणि तमिळनाडुमध्येसुधा पहिल्यांदाच .. खरं केवढा मोठा देश आहे ..उत्तरेच्या लोकांच्या द्रुष्टीने मुंबई म्हणजे साऊथ .. मराठी लोकांच्या द्रुष्टीने बंगलोर म्हणजे साऊथ पण बंगलोरपासुनही कन्याकुमारी साधारण ८०० कि.मी आहे .. एवढा मोठा देश हा एक देश म्हणुन कसा काय टिकुन राहीला .. आश्चर्य आहे खरोखर. २८ राज्य आणि प्रत्येकाची जवळ जवळ वेगळी भाषा. even after being so densely populated how come so many different languages evolved. भाषांमध्ये साधर्म्य आहे no doubt पण १ माणुस दुसरीकडे जाउन लगेच communicate करण्याएवढही नाहिये आणि ह्याचा प्रत्ययही लवकरच यायला लागला. जसे जसे आम्ही बंगलोर पासुन लांब जात होतो तसा तसा माझा कानडी येत असल्याचा अभिमान गळुन पडायला लागला. म्हणजे १०० किमी च्या आतच एवढा फ़रक ?? जर सपाट मैदानी भूभागाची ही अवस्था तर पुर्वोत्तर राज्यांची काय परिस्थिती असेल ??? how are we going to connect ? तसा फ़ार मोठा प्रश्न आहे अश्यातला भाग नाही पण जर त्या भाषा येत असल्या तर bond जास्त strong होइल असं मला वाटतं. माझ्या मते कोणत्याही माणसाशी connect होण्याचे २ सोपे पर्याय म्हणजे १. त्या व्यक्तिची भाषा किंवा २. त्याचे आवडते अन्न :-) .. not funny, it really works .... शाळेतल्या मुलांना indo-aryan भाषेबरोबरच indo-dravidian आणि ते मुंडा लोक जे होते त्यांची भाषा(tibeto-burman ?) निवडण्याचा पर्याय असतो का ? नसला तर असायला पाहिजे... at least ह्यापैकी १ तरी भाषा यायला पाहिजे. आणि भाषा ह्या लहानपणीच पटकन शिकता येतात कारण तेंव्हा आपला मेंदू एवढा साचेबद्ध आणि logical झालेला नसतो .. जे आहे ते लक्षात ठेवायचं उगाच - हे असंच का?, मग त्या भाषेत तर असं नाही, छ्या ! ह्या भाषेला काही नियमच नाही वगैरे अडमुठेपणा यायच्या आत. असो .. तर मजल दर मजल करत .. मध्येच थांबुन डोंगराआडुन वर येणारा सुर्य पहात आम्ही २ तासात कृष्णगिरीला पोचलो. कृष्णगिरीला पोचलो. कृष्णगिरीला पोचल्यावर NH-7 वरुन डाविकडे वळुन NH-46 घ्यायचा आणि २०० मिटरवर लगेच उजवीकडे वळुन NH-66 घ्यायचा. निघायच्या आधी अनिकेतनी हा रस्ता खराब आहे असं सांगितलं होतं, त्यामुळे मनाची तयारी होती. actually कृष्णगिरी पासुन साधारण ३०किमीचा रस्ता हा खुप खराब आहे पण त्यापुढचामात्र तसा चांगला आहे. रस्ता छोटा आहे पण तशी रहदारीसुधा कमी आहे फ़क्त १खादी बस जर समोर असली तर irritate व्हायला होतं. खड्डे चुकवत आणि चुकुन १खाद्या खड्ड्यात गाडी गेलीच तर गाडीची माफ़ी मागत साधारण ११ वाजता टळटळीत दुपारी तिरुवन्नमलईला पोचलो. ही सगळी तशी छोटी गावं आहेत. तशीच तिथली hotels सुधा छोटी त्यामुळे नवाबांच्या पसंतीस १ही hotel उतरेना आणि विजयची परिस्थीती अगदी लहान मुलासारखी. दुपार झाली भुक लागणार .. भुक लागली लग्गेच खायला पहिजे .. नाहीतर तोंड केविलवाणे करणे .. वाटेत कुठेतरी नाहिसे होणे .. "बाई glucose की कमी मेह्सुस हो रही है" वगैरे dialogue सुरु होतात :-) .. शेवटी १ ठिक्ठाक hotel सापडलं. गेल्यावर इडली वडा order केलं .. आणुन दिल्यावर पाहतो तर काय .. ४इडल्या आणि १ वडा.. हि ह्यांची १ प्लेट. पण तेवढ्यावर भुक भागणार नव्हती म्हणुन ३ डोसे सांगितले .. पहिला डोसा आणल्यावर बघुनच आम्ही गार .. ३-४ डोस्यांएवढा तो १ डोसा होता .. १ डोसा cancel करुन आम्ही मोर्चा पेयांकडे वळवला .. प्रत्येकी ३-४ बाटल्या(कोक आणि मिरिंडा उगाच चावट अर्थ काढु नये) रिचवल्या. ह्या सगळ्याचे बिल बंगलोरपेक्षा अर्धे आले. हे सगळं ह्यासाठी कि जेव्हा केव्हा असल्या ठिकाणी जाल तेव्हा आधि quantity बघणे आणि मग order करणे. तिरुवन्नमलईपासुन परत चांगला रस्ता सुरु होतो. तिरुवन्नमलई ते तिंडिवनम हा रस्ता साधारण चांगला आहे .. पण तिंडिवनम ते pondicherry हा रस्ता awesome आहे .. म्हणजे लै भारी आहे .. ६ पदरी रस्ता, रहदारी जवळजवळ शुन्य, टळटळीत दुपारची वेळ .. आणि जवळजवळ १ ते १.५ किमीपर्यंतची clear visibility.. मग काय बराच वेळ लगाम लावलेल्या आमच्या गाड्या तुफ़ान उधळल्या .. ९० च्या खाली यायचं कामंच नाही.. आणि गाड्याही कुठल्या तर electra, thunderbird आणि pulsar 220. अर्धा तास सतत असं चालवल्यावर engineची थोडी दया आली आणि गाड्या सावलीला लावल्या. तिथुन निघाल्यावर साधारण १५ मि मध्ये पुदुचेरीला पोचलो. आता महत्वाचे काम म्हणजे राहण्याची जागा शोधणे आणि एव्हाना फ़ायनल मॆच सुरु व्हायची वेळ झाली होती. Lonely planet च पुस्तक उघडुन १केका हॊटेलचा नं. फ़िरवायला सुरुवात केली. माझा अंदाज असा होता की world cup final आणि जाळणारा उन्हाळा ह्यात कोण येणार .. पण अंदाज साफ़ चुकतोय अशी उत्तरं फोनवर मिळायला सुरुवात झाली. finally ginger ह्या महागड्या hotelमध्ये रहायची जागा होती. आता पुढचा प्रश्न ginger शोधणे .. थोडी फ़िराफ़ीर झाल्यावर शेवटी तो लाल बोर्ड दिसला .. एव्हाना विषुववृत्तिय उन्ह ६ तासांचा प्रवास ह्यामुळे दोघेही वैतागले होते पण gingerच्या एसी मध्ये शिरल्यावर हाSSSSयसं वाटलं... पुढचा प्रोग्राम काय तर match :-) .. खाली already बरेच लोक CCD च्या loungeमध्ये मॆच बघत होते .. आम्हीही सामील झालो .. जरा उन्ह कमी झाल्यावर बाहेर पडलो ते थेट beach road ला पोचलो. ह्या रस्त्यावर गाड्यांना परवानगी नाही... हा रस्ता म्हणजे साधारण १किमी चा समुद्राकाठचा रस्ता .. इथे beach असा नाहिये .. मुंबईच्या marine drive सारखा पण छोटा .. वाहनांचा गोंगाट नसलेला .. संध्याकाळी चालायला येणारे लोक .. आमच्यासारखे प्रवासी .. आणि अर्थातच्या खायच्या पदार्थांच्या गाड्या. ह्याच रस्त्यावर गांधीजींचा मोठा पुतळा आहे .. समुद्राकडे पाठ करुन .. हे असं का माहित नाही .. पण त्याच बरोबर Dupldiex पुतळा .. फ़्रेंच war memorial जुने दीपगृह आहे आणि हे माझं भारताच्या पूर्व किनारपट्टीचं पहिलं दर्शन .... बंगालच्या उपसागराकडे पहिल्यांदाच पहात होतो .. १ वेगळंच feeling होतं .. म्म नाहिये सांगता येत .. पण तो सरळ रस्ता .. आजुबाजुच्या फ़्रेंच इमारती .. वसाहतीची असलेली व्यवस्थित आखणी .. सगळं पाहुन जर भारतावर फ़्रेंचांच राज्य असतं तर परिस्थीती बरीच वेगळी आणि चांगली असली असती असं वाटलं. १ तर ते लोक एवढे aggressive/dominating नसावेत .. आणि फ़्रेंचाविरुद्ध उठाव झालेला वाचल्याचं काही माझ्या आठवणीत नाही. तर पुदुचेरी .. पुदुचेरी हा केंद्रशासीत प्रदेश ३ भागांनी मिळुन बनलेला आहे. त्यातला पुदुचेरी हा सगळ्यात मोठा. इतर दोन भाग म्हणजे आंध्रप्रदेशातील यानम आणि केरळमधील माहे. ह्या सगळ्य़ांमध्ये फ़्रेंच ही कार्यालयीन भाषांपैकी १ आहे. स्वातंत्र्यानंतर १९५४ पर्यंत हा भाग फ़्रेंचाच्याच ताब्यात होता ... आणि तेव्हापासुन ते आजतागायत हा केंद्रशासित प्रदेश आहे. फ़्रेंचाच्या भारतात इंग्रजांविरुद्ध २ मोठ्या लढाया झाल्या १ म्हणजे प्लासी आणि दुसरी म्हणजे वांडिवॊशची.. दोन्हीमध्ये फ़्रेंचांनी मार खाल्ला. पण कुठल्यातरी करारानुसार इंग्रजांनी हा भाग फ़्रेंचांना परत दिला. अजुनही इथे फ़्रेंचाची थोडी छाप दिसते. पोलिसांच्या टोप्या, hotels ची नावं वगैरे वगैरे .. hotel च्या नावावर जाउ नये. नुसतं नाव फ़्रेंच पण खाद्यापदार्थ सगळे देशी पद्धतीचे. १ ’ला तेरास’ .. नावाचं hotel आहे तिथला pizza मात्र मस्तं होता .. बहुतेक मालकीणच pizza करते. अतिशय पातळ बेस आणि अतिशय चविष्ट असा पिझ्झा तिथे मिळतो. संध्याकाळी चालत भटकुन आमचे पाय एव्हाना दुखायला लागले होते आणि मॆच पहायची उत्सुकता होतीच. म्हणुन मग हॊटेल वर परत आलो .. मग काय मॆच..शिट्ट्या .. दंगा etc. etc. करुन .. सकाळी सुर्योदय पहायचा नक्की करुन झोपलो.
रविवार ०३-०४-२०११
Way to Auroville Aashram |
सोमवार ०४-०४-०५
RaajaagirI fort |
1. Everything around us can be represented and understood through numbers.
2. If you graph these numbers, patterns emerge. Therefore : There are patterns everywhere in nature.
-Max Cohen in Pi.
संध्याकाळी ४ च्या सुमारास कृष्णगिरीला पोचलो आणि नि:श्वास टाकला. आता काय व्यवस्थित चौपदरी रस्ता थेट बंगलोर पर्यंत. रात्री घरी पोचलो तेव्हा सर्व अवयवांनी धन्यवाद दिले आणि मीही त्याना .. मस्तं गरम पाण्यानी आंघोळ केली आणि how i met your mother बघत झोपलो .. :-) ...