Tuesday, June 10, 2008

डेक्कन ओडिसी

बुलेट घ्यायची आणि मनसोक्त भटकायचं अगदी सगळीकडे भटकायचं ही फ़ार लहानपणापासुनची इच्छा .. मोठं झाल्यावर बुलेट हे काही साधं प्रकरण नाही हे कळलं पण म्हणुन लहानपणासुन जपलेलं .. पाहिलेलं स्वप्न असच सोडुन द्यायचं ... शक्यच नाही .. मग हे एवढं काम कशासाठी ..शेवटी येणार येणार म्हणता म्हणता Bullet आली .. तिची पहिली १००० किमी पुर्ण झाली .. बर्रेच दिवस रेंगाळलेला प्रोजेक्ट संपला ..त्यालातर अगदी गाडीत बसवुन पाठवला . so everything was set for one more of the stress busters आणि ह्या पावसाळ्यात फिरण्यासाठी चिकमंगलुरपेक्षा भारी जागा कोणती असणार ... मग त्याच्या आसपासचा भाफ़िरायच नक्की केलं ..
सागर सेठला फोन केला .. हा माणुस कधीही कुठेही यायला १का पायावर तयार असतो .. त्याला फोन केला ..साहेब लगेच जायच्या दिवस आधी हजर. कंपनीत दिवस येणार नाही असं सांगुन टाकलं... आता काय निघायचं बास्स्स्स !!!!

--०८

तारीख थोडक्यात वेडीवाकडी झाली .. असो .. तर आद्ल्या दिवशी सगळी तयारी करुन झाली होती . नेहेमीप्रमाणे सक्काळी :३० ला घरातुनबाहेर पडायचं नक्की केलं. पण नेहेमीप्रमाणे नव्हतंच .. मी गजर बंद करुन खुशाल झोपलो. दोघही लवकर उठण्याच्या मूडमध्ये नव्हतो . शेवटी :३० उठलो आणि साधारण अर्ध्या तासानी घराबाहेर पडलो. तोपर्यंत वाहतुक अगदी जोरदार सुरु झाली होती .. रस्त्यावर ११० तरी trucks १काच वेळेला चालले होते. outer ring rd वरुन नेलमंगलापर्यंत पोचायलाच तासभर लागला ..हा NH-4 वरचा प्रवास .त्यात लोकानी रस्ता दोन्ही बाजुनी खणुन ठेवलेला मेट्रोच्या कामासाठी. सगळा आनंदच एकंदरीत. नेलमंगलाहुन डावीकडे वळल्यावर NH-48 लागतो. ह्या रस्त्यानी थेट हासनपर्यंत जायचं. हा रस्ता अतिशय छान आहे .. तसे कर्नाटकातले सगळेच रस्ते मस्तं आहेत आणि ह्यामुळेच इथे tourism छान develop झालं आहे. आपल्या महाराष्ट्रात काही असं दिसंत नाही अजुन. असो ते विलासराव बघुन घेतील .. आणि मी स्वत: मतदान केलं नाहीये त्यामुळे इथे बसुन शहाणपणा सांगण्याचा काही हक्कंही नाहिये. हा तर .. ह्या रस्त्यावरुन आम्ही निघालो होतो.
this rd is just like a runway ..त्यात परत बुलेटवरची ही पहिलीच ्रिप त्यामुळे आम्ही सुसाट निघालो होतो .. तरी हा रस्ता पदरी नाहिये .. गडगडाट करत बुलेटवरुन असल्या रस्त्यानी जाण्यात काय मजा आहे वा !!! इथे लिहीणं निव्वळ अशक्य .. असं मस्तंवालपणे छातीवर वारं घेत जाणं म्हणजे थेट stallion type वाटंत होतं(नाहिये माहितीये पण वाटण्यात काही चुक आहे का ?) . घोडा हा असा १कच प्राणीआहे जो vegetarian असुनही रुबाबदार दिसतो .. बाकी सगळी म्हणजे अगदीच काहीतरी ..म्हणजे सुंदर दिसु शकतात पण रुबाबदार नक्कीच नाही .. तेच पाहिलं तर सगळे मांसभक्षक कसले देखणे असतात वाघ , सिंह, लांडगे ..etc . त्यातही स्वत: शिकार करुन खाणारे आणि scavengers वेगळे दिसतात .. तरस , गिधाडं किळसवाणी दिसतात पण गरुड, ससाणे रुबाबदार ... माणसाच्या खाण्यावर त्याचा स्वभाव अवलंबुन असतो किंवा त्याचा जसा स्वभाव असतो तसाच त्याचा आहार .. .....
तर रस्त्यावरुन जात असताना आम्ही तसलेच कोणीतरी असल्याचं मनात नक्की झालं होतं आमच्या, निदान माझ्यातरी .. सागर शाकाहारीआहे मंद कुठला ...वाटेत नेहेमीप्रमाणे मस्तं डोंगर दिसला आणि त्यावर १कच ढग होता
volcanic eruption च्या आधी किंवा मध्ये कधीतरी हे असे ढग असतात ना त्याच्या तोंडापाशी तसलंच काहीतरी दिसत होतं.
त्यानंतर १का ठिकाणी काहीतरी खायला म्हणुन थांबलो .. तिथे पोळीच्या आकाराच्या ईडल्या मिरची भजी असं व्यवस्थित खाउन पुढे निघालो ते
direct हासनलाच थांबलो पेट्रोल भरण्यासाठी .. गाडीचं पोट भरुन पुढे चिकमंगलुरच्या दिशेनी निघालो ..ह्या रस्त्यावरतर traffic खुपच कमी आहे ..म्हणजे मला रस्त्याच्या मध्यभागी उभं राहुन हा फोटो काढता येण्याएवढा ..वेड लावणारा रस्ता आहे .. असाच्या असा गुंडाळी करुन घेउन जायचा .. पाहिजे तेव्हा उलगडायचा आणि सुटायचं ..
कानात वारं शिरल्यासारखंच झालं होतं .... generally फ़िरताना मला इतिहास आणि संस्कृती ह्यांची सांगड घालणा-या भागात फ़िरायची आवड आहे. माझ्या काही dream destinations पैकी म्हणजे इस्तंबुल .. खुश्कीच्या मार्गासाठी प्रसिद्ध असणारं ... किती जुनं आणि cultural mixture असणारं शहर असेल ते .. तुर्क , युरोप, अरब , रशियन आणि बरंच काय काय .. तर तिथल्या त्या प्रसिद्ध बोस्पोरस पुलावरुन गाडी चालवणे ही अजुन इच्छा.. तसं म्हटलं तर हे सगळे लोक वेगवेगळे पण काहीतरी साम्य असलेले .. हे आर्यही तिथुनच कुठुनतरी आले असावेत .. the warrior cast .. आपण खरे आर्य नाहीच .. खरंतर भारत ..हा भारत नसुन united states of india आहे असं वाटतं कधी कधी .. तसं बघायला गेलं तर काय साम्य आहे काश्मीरी आणि तमिळ लोकांमध्ये .. ईंग्रजांविरुध्द लढताना १त्र आले म्हणुन भारत .. नाहितर आपला देश हा आपला देश असता ?आतातर ग्लोबलयझेशनमुळे कोण कुठला काय .. सगळंच विरघळल्यासारखं झालंय ..ते जेव्हा खेड्यात पोचेल तेव्हा वेगळं असं काही राहणारंच नाही .. पण तसं व्हायला नको .. ते नैसर्गिक वाटंत नाही .. पण तसं झालंतर आता जेप्रांतिक वाद चालु आहेत ते राहणार नाहीत .. मुळात ही भाषावार प्रांतरचनेची idea मला पटलेली नाहिये .. govt. itself has given reason for the conflict .. तसंच हे cast प्रकरण .. त्यावर तर एवढा काथ्याकुट झालाय की अजुन काही बोलायची गरजच नाहिये ..पण डोकं आपल्या हातात असतं का ? हो दुखायला लागलंकीच असतं .. वरची cast खालची cast हे काय प्रकरण आहे .. race started at the same time for everybody .. nobody was given advantage then .. it was nature who might given something extra to some of the people .. and those outclassed rest of the species .. तर मग हा प्रश्न येतोच कुठे ?? का माणुसकी म्हणुन हे सगळं ?? वाघ सिंहंसाठी आपण अभयारण्य केलीत .. तर त्यानी त्यांनी अजुन जागा मागायला सुरुवात केली तर आपण देणार का ? तसं पहायला गेलं तर हुशार .. नुसतं हुशार असं नाही तर कुठल्याही क्षेत्रात ज्यांना दैवी देणगी आहे त्यांच अस्तित्वच non-blessed speciesसाठी असणारी competition आहे .. भारत हा १कच देश आहे ज्यात मागासपणा prove करण्यासाठी आंदोलन होत असेल .. उद्या जर माकडांसाठी reservation आणलं तर शेपट्या लावुन reservation घ्यायलाही कमी करणार नाहीत लोक .. अरे किती खाली जायचं ...असो तो कही मुद्द नाहिये लिखाणाचा ...
चिकमंगलुरच्या दिशेनी जसं जसं जायला लागलो तसं तसं ढगांची आकशात गर्दी वाढायला लागली .. वाटेत जाताना रस्त्यावरुन कळणारही नाही असं छोटसं धरण लागतं यागची नावाचं .. अतिशय कमी गर्दी ,स्वच्छ पाणी ,थेट भिंतीपर्यंत जायची परवानगी आणि फोटो काढायसाठी मनाई वगैरे काही नाही ..मनसोक्त पाणी बघुन पुढे निघालो .. चिकमंगलुर गावातुन बाहेर पडुन मुल्लायनगिरीच्या रस्त्याला लागलो .. घाटात जसं जसं वर चढायला लागलो तशी तशी हवा थंड होत होती .. दोन्ही बाजुला coffee estates ला जाणारे रस्ते होते .. उंचच्या उंच सरळसोट आकाशाकडे जाणारी झाडं .. हवेला येणारा ओलसर निलगीरीचा वास .. प्रसन्न करणारा होता .. very refreshing .. उगच कविता वगैरे सुचणारा होता .. सागरला मागे पाट्या वाचायला बसवलं होतं पण तो नुसताच प्रेक्षणिय "स्थळं" बघत होता .. मध्ये - दा आम्ही चुकिच्य रस्त्यावरही गेलो पण ते फ़ारतर - kms असेल मग सरळ १का पाटीचा फोटोच काढुन ठेवला प्रोब्लेमच नको . घाटातुन वर जाताना आधी लागतो तो सितलायनगिरी .. ह्या सितलायनगिरीला पोचलो तेव्हा तिथे already 1 bullet उभी होती .. तीही अशीच मस्त दिसणारी :D .. तिथे चक्क शूटींग चालु होतं .. माझ्या आयुष्यातलं पहिलं शूटिंग actress कोण आहे ते लगेच कळत होतं actor काही दिसत नव्हता आणि तसंही त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं नसतं. कोण actress होती ते काही कळलं नाही पण छान होती बापडी ..१५-२० मि. आम्ही ती काहीतरी शॊट देइल म्हणुन वाट पहात होतो पण तिचा अर्धा वेळ केस आणि चेहेरा ह्यात गेल्यावर शॊट नीट नाही म्हणुन कट .. मग वैतागुन निघालो तिथुन .. मुल्लायनगिरीकडे .. सुरुवातीचा रस्ता चांगला आहे .. पण नंतर रस्ता संपतो आणि मातीचा कच्चा रस्ता सुरु होतो तोही घाटातला .. इथे गाडी खुप सांभाळुन चालवावी लागते. मुल्लायनगिरीला पोचल्यावर खाली गाडी लावुन पाय-यांवरुन वर चालत जायचं .. वरती खुप जोरदार वारं होतं आणि १दम बोचरं .. आम्ही लगेच शिरस्त्राणं चढवली म्हटलं अजुन दिवस आहेत जास्त शहाणपणा नको ... दुपारचे ४ वाजले होते .. आणि समोर कोकणाच्या म्हणजे कर्नाटकातल्या कोकणाच्या बाजुनी ढग इकडे डोंगराकडे यायला .. आमच्या समोर मान्सून घाटमाथ्यावर येत असल्यासारखा .. मागे १दा मायबोलीवर वाचलेल्या कविता ८वली .. संघमित्रा नावाच्या userनी पोस्ट केली होती ..
झाकोळ नभाच्या पार,
क्षितीजावर काजळभार.
मन कुंद होतसे हट्टी,
वा-याची बदले पट्टी.
झुळुकेचा हो सोसाटा,
अन सैरावैरा वाटा.
झाडांचे झडती मुजरे,
अन सावध करती हुजरे.
मेघांची मिरवत माला,
सम्राट ऋतुंचा आला.

simply amazing .. डोळ्यासमोर जे दिसतंय ते शब्दात express करता येतंय .. किंवा कवितेत काहीतरी लिहिलय तेच समोर दिसणं .. एवढं भारी feeling होतं ते .. मला तेही सांगता येत नाही .. आणि त्या कवयित्रीला ते छंदात वगैरे लिहीता आलं .. तिला शि. सा. न.
आता कवितेच्या राज्यातुन सत्य आणि शाश्वतात आल्यावर कळलं की लवकरात लवकर इथुन पळणं भाग आहे नाहीतर त्या मातीच्या रस्त्यावरुन गाडी चालवताना तंतरेल. तिथुन पळतच खाली निघालो. खाली पोचल्यावर पहिल्या २-या gear मधुन गाडी सावकाश चालवली डांबरी रस्त्यावर येईपर्यंत आणि नंतर regular स्पीडनी जायला लागलो पाउस चांगलाच सुरु झाला होता.. घाटातुन काही मुलं-मुली वरती चालत निघाली होती .. पण पावसामुळे त्यांनीही पुढे जायचं रद्द केलं.. १ चांगली जागा शोधुन आम्ही थांबलो .. आणि पावसातले काही फोटो काढले .. वाटेत १का गावाच्या बाजारात विकत घेतलेल्या plasticचा इथे छान उपयोग झाला .. तिथे बसुन आम्ही slice पिलं .. पावसात बसुन slice पिणं हे स्वर्गीय सुखांपैकी १ होतं. संध्याकाळचे ४ वाजले होते म्हणुन मग पुढे बाबा बुडन्गिरी कडे निघालो . हा बाबा बुडनगिरी म्हणजे मंदीर आणि दर्गा असं दोन्ही आहे. ह्या घाटात भरपुर पाउस आणि धुकंही होतं. visibility फ़क्त ५-१० फुट असेल. मग ३०च्या स्पीडनी हळुहळु गाडी हाकत पुढे निघालो. घाटात अजुनही बरेच bikers दिसत होते. प्रत्येक bikeवर १ साजेसा pillion riderही होता. ते पाहिल्यावर साग्या मला विचारतो किती दिवस असं आम्हाला घेउन फ़िरणार ? ह्यावर माझ्याकडे काय उत्तर होतं .. काही नाही फ़क्त १ fact .. आणि त्यामुळेच मी
इथे स्त्रीजातीबद्दल रोष व्यक्त करु इच्छितो .. ही माझी जागा आहे at least इथे मी काहीही करु शकतो. त्याला म्हणालो ..
सायकल झाली,scooter झाली,tvs victor झाली , pulsar झाली आत bulletही झाली काही फ़रक नाही म्हणजे problem हा गाडीचा नाही माणसाचा आहे . तर इथे मी स्त्रीजातीला नमूद करु इच्छितो की माझ्या गाडीचे pillion seat हे काट्याचे नसुन मऊ स्पंजचेच आहे आणि तिथे बसलेलं मला चालतं.
तर ह्या घाटात तुफ़ान थंडी होती. दातांचा ताशातर केव्हाच सुरु झाला होता. थंडी १०० ft per sq cm per sec ह्या स्पीडनी हाडापर्यंत शिरत होती
.. तिथे रहायची काय सोय आहे ह्याचीही काही कल्पना नव्हती. bb hills च्या ४किमी अलिकडे रस्त्याच्या कडेला १ cottage दिसलं. तिथे विचारल्यावर कळलं कि मालक साहेब कुठेतरी गेले आहेत आणि ते काही नजीकच्या भविष्यकाळात इकडे येणार नाहीत. नुसतं थांबण्यापेक्षा बाबु ला जाउन यायचं ठरलं. ते ४ किमी जायला १५ मि.तरी लागली असतील. कधी १दा पोचतो असं झालं होतं. वरती पोचल्यावर काहीही दिसत नव्हतं. म्हणुन आधी रूम शोधुन सामान टाकुन पुढे भटकायचं ठरवलं. पण काही रिकामं नव्हतं. निवारा नाही .. वस्त्र ओली होती.. मग उरलं काय .. अन्न !! १का टपरीवर जाउन गरमागरम चहा घेतला पण हाताला काही जाणवतंच नव्हतं. तोंडाला मस्तं चटका बसला पण ..
तिथली पोटपुजा आटोपुन परत खाली cottage पाशी आलो. तिथे मालक अजुनही आला नव्हता. मागनं अजुनही लोक यायला लागले होते .. मग आम्ही स्वत:च १ रूम उघडुन त्यात सामान ठेवुन टाकलं. मालक आल्यावर बघता येईल. थोड्या वेळात तो बाबा आला .. आणि त्यानी ती रूम आम्हालाच दिली. कधी १दा त्या खोलीत जाउन कोरडे कपडे चढवतो असं झालं होतं. १तर पाउस त्यात थंड बोचरं वारं .. सगळे अवयव बधीर झाले होते. खालच्याच खोलीत कौस्तुभ भेटला .. हा मनुष्य मला वर्षभरापुर्वी badminton tournamentsच्या वेळेला भेटला होता. तो आणि त्याचे मित्र आले होते .. आता नविन अस्तित्वात आलेला प्रश्न म्हणजे रात्रीच्या जेवणाचं काय .. माझीतरी परिस्थीती अशी होती कि आता उपास घडला तरी चालेल पण परत पावसात नाही. पण खालच्या लोकांकडे गाडी नव्हती आणि ४ किमी जाण्यासाठी दुसरा काहीच option नव्हता.
मी माझी नवी गाडी दयायच्या condition मध्ये नव्हतो .. मग काय परत गाडीवरुन वर जाउन खायला काहीतरी आणायचं ठरलं. त्यांच्यातला १ जण बरोबर येणार होता. एव्हाना बाहेर पुर्ण अंधार पडला होता. headlight चालु केला तर तो गाडीचं पुढचं चाक संपायच्या आतच धुक्यात हरवत होता. मग अतिशय concentration नी फ़क्त १० च्या स्पीड नी पहिल्या गिअरमध्ये गाडी चा्लवत वर जाउन खायला घेउन आलो. हा driving मधला सगळ्यात अवघड पार्ट होता. रस्त्याच्या मध्यभागातुन गाडी चालवावी लागत होती. रस्त्याचा मध्यभाग म्हणजेही अंदाजच.
नंतर नंतर हिप्नॊटाइझ झाल्यासारखं वाटत होतं शेवटी १दाचा तो पार्ट संपला. वर येउन मेणबत्तीच्या प्रकाशात कोरडे कपडे घातले .. किती सुख
आहे .. नुसते कोरडे कपडेही सुखाची परमावधी असु शकतात.. आवरुन झाल्यावर आणि खोलीभर ओल्या कपड्यांचा पसारा मांडुन मध्यात बसुन खायाला आणलेल्या रबरी पोळ्या आणि त्याच्याबरोबरचा तो कसलातरी रस्सा खाउन ब्लॆंकेटमध्ये शिरलो .. दिवसभरच्या प्रवासानी दमलो असलो तर रात्री ब-याच गप्पा मारत होतो .. नंतर फ़क्त सागर बोलत होता .. मी काही response देत नाहीये हे त्याच्या ब-याच वेळानी लक्षात आले ... माझा fuse कधीच उडाला होता.

८-०६-०८

सकाळी उठल्यावर मग त्यानी भरपुर शिव्या दिल्या मला ... आता मला काय माहित कि मी कधी झोपणार आहे ते ..
मला सकाळी लवकर जाग आली.. साधारण ६ च्या सुमाराला उठलो .. १ छोटासा video shoot केला आणि सागरला उठवलं.
हा कार्यकर्ता रात्री उठुन अजुन जास्त कपडे चढवुन झोपला होता. सकाळचं आवरुन खोली सोडली. खाली आलो तर लोकं त्या धुक्यात cricket
खेळत होती. खालच्या खोलीतल्या लोकांना टाटा करुन .. पुढे निघालो. सगळ्यात आधी केम्मेनगुंडी आणि मग हेब्बे falls वगैरे plan होता.
सकाळी सागरनी गाडी चालवायला घेतली होती. त्याच्या चालवण्यामुळे मला जाम भिती वाटत होती. पण त्यानी चालवली व्यवस्थित. केम्मेनगुंडीकडे जाताना १ फ़ाटा लागतो त्या फ़ाट्यानी साधारण ८ किमी वर हेब्बे falls आहे. हा रस्ता फ़ार वाईट आहे .. म्हणजे मुळात हा रस्ताच नाहिये .. त्यात पावसानी चिखल आणि निसरडा झालेला ... सरळ असतातर जाताही आलं असतं पण हा घाटातला होता .. hair-pin bends असणारा ..
आणि दरीच्या बाजुला काही railingवगैरेही नाही .. so we canceled the plan to go there and started back towards kemmenagundi .. the rd to kemmenagundi was much better than this. kemmanagundi is like ooty. a nice clean and calm hill station where the road takes u to the topmost of the hillock via nice hair-pin curves and greenest of the plants.सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण झाली होती. लहान मुलांना रंग शिकवण्यासाठी असल्या ठिकाणी आणलं पाहिजे. हा रंग म्हणजे हिरवा असं जर त्याना शिकवलं तर ती मुलं कधीच विसरणार नाहीत हे. रंग वास आकार हे असेच शिकवले पाहिजेत .. where they really touch ur soul through ur senses. शाळेत चित्रात रंग भरताना हे असं त्यांच्या लगेच डोक्यात येणारंच.
मलातर हिरवा वासही येतो... पावसाळ्यात कुठल्याही डोंगरावर गेलो की येणारा. हे असलं सगळं आजुअबाजुला असलं कि nostalgic व्हायला होतं. लगेच बालभारती .. नविन वह्या पुस्तकांचा वास .. मराठीच्या पुस्तकातल्या छान कविता ..धडे .. नविन uniform सगळं असं ८वायला
लागतं. बाहेर अशी मस्तं पावसाळी हवा असली .. कि आई बाबा किंवा दादा आणि बाबा शाळेत येणार ... मग मास्तरांना सांगुन आम्ही सगळे वेरुळ किंवा दौलताबाद किंवा किमानपक्षी गोगानाथाची टेकडीतरी...मग भिजुन घरी आलं स्वच्छ कोरडे कपडे घालायचे .. generally अश्या वेळी दिवे गेलेले असायचे .. मग मेणबत्तेच्या प्रकाशात .. रामरक्षा गीतेचा १५वा अध्याय अथर्व-शीर्ष .. पाढे , वर्ग घन वगैरे ... म्हणायचं तोपर्य़ंत मस्तं पिठलं किंवा तसलंच काहीतरी आईनी केलेलं असणार ते खाउन गोष्ट ऐकत झोपायचं .. केवढं साधं आणि मस्तं life होतं ..

केम्मेनगुंडी फ़िरुन झाल्यावर परत पोट नावाच्या १ महत्वाच्या अवयवानी ते असल्याची जाणीव करुन द्यायला सुरुवात केली. हॊटेल मध्ये फ़क्त इडल्याच होत्या.. मग इडल्या आणि गुड डे खाउन बाहेर पडलो. next destination was hebbe falls. ह्या धबधब्यानी आमचा व्यवस्थित अपेक्षाभंग केला .. १ मंदीर तिथे छोटासा ओहोळ बास ... तिथे जास्त वेळ न घालवता आम्ही सरळ भद्रा डॆमच्या दिशेनी
निघालो.
हेब्बे फ़ॊल्सहुन घाटाची उतरण सुरु होते. घाटातुन खाली जायाला लागल्यावर ढग कमी कमी होत जातात आणि मग पुढे गेल्यावर तर चक्क उन पडलं होते .. १तर आम्ही सकाळी निघताना आदल्या दिवशीचे ओले कपडे परत चढवले होते कारण आमच्या
जवळ आता फ़क्त १कच कोरडा जोड शिल्लक होता आणि तो emergency म्हणुन ठेवला होता.सकाळच्या थंडीत ते कपडे आणि ओले सॊक्स घालताना प्रचंड जिवावर आलं होतं आणि त्या सगळ्यानंतर आता direct कोवळं उन ..आहाहाहा !!
तिथे लिन्गदहळ्ळी गावाच्या सुरुवातील १का शेतात १ उंचच्या उंच झाड होतं आणि त्याच्यावर कसलीतरी लाल-गुलाबी फ़ुलं होती ..आवडलंच ते १दम. लिंगदहळ्ळीहुन बाहेर पडुन तरिकेरेला जायचं आणि तिथुन पुढे लाकावल्लीला जायचं .. रस्त्यावर

सगळीकडे बोर्ड आहेत आणि हा रस्ताही चांगला आहे. भद्रा डॆमला सुदैवानी अजिबात गर्दी नव्हती. धरण तसं छोटसं आहे ..आणि धरणाचं पाणी खुप स्वच्छ आहे .. जिथे पाणी उथळ आहे तिथे तळही दिसतो. पोहायला अगदी tempting असं

होतं पाणी. निव्वळ आम्ही सतत ओले होतो म्हणुन पाण्यात गेलो नाही नाहीतर नक्की २-४ उड्यातर मारल्याच असत्या.मी लहान असताना
१दा सांगलीहुन गणेशवाडीला गेलो होतो सायकलींवरुन. तिथे १ विहीर होती छानपैकी बांधलेली काळ्या
कातळाची. तिथलं पाणी १दम निळंशार होतं तसलंच होतं ह्या धरणातलं पाणी.तासभर तिथे थांबल्यावर जेवणासाठी लाकवल्ली गावात आलो. तिथे मासे पोळ्या वगैरे जेवलो(मी) आणि दहीभात(सागर जैन).जेवणं होइपर्यंत ३:३० -४ काहीतरी वाजले
होते. हळेबीडला जाउन मुक्काम करायचं ठरलं.६० किमी च्या आसपासचं अंतर होतं.इथुन पुढे सागरनी गाडी चालवायला घेतली.तरीकेरेहुन कडुरपर्यंत NH-206 नी गेल्यावर उजवीकडे वळावं लागतं. ह्या रस्त्यानी चिकमंगलुरला जायचं.रस्त्यावरनं
जाताना १का ठिकाणी शहाळं प्यायला थांबलो. शहाळं केळी वगैरेचे २२ रु. झाले. माझ्याकडे सुटे पैसे नव्हते म्हणुन मी त्या आजीबाईना २५ रु दिले.१तर त्या निर्मनुष्य रस्त्यावर ती १कच झोपडी होती. मग मी त्याना उरलेले पैसे राहु द्या म्हणायच्या
आत त्याच मला राहुदे म्हणाल्या आणि मी वरचे ५ रुपये दिले तर त्यांनी इकडुन तिकडुन डब्यातुन शोधुन ३ रु दिले. कुठे हे लोक आणि कुठे बंगलोर मधले लोक .. किळसवाणेपणे 'चेंज इल्ला सार' असं म्हणतात तोंड वेंगाडत.
बिरुर कडुर चिकमंगलुर करत करत संध्याकाळी ८ च्या सुमारास हळेबीड ला पोचलो. मंदीराच्या अगदी जवळच कल्पतरु नावाचं लॊज आहे. स्वस्त आणि स्वच्छ आहे. तिथल्या स्वर्गातल्या गादीवर सगळी कोरड्या जमीनीवर पाय ठेवताना खरोखरच स्वर्गात असल्याचा भास होत होता. अर्धा तास नुसतेच गादीवर पडुन होतो. हात पाय धुवुन आवरुन मग बाहेर पडलो. जेवणासाठी शाकाहारी हॊटेल कुठे आहे का शोधत असताना काही लोकानी नांजुन्देश्वर नावाची मेस आहे असं सांगितलं जिथे पोळ्या मिळतात. मग का तिकडे जायालाच पाहिजे.शोधत शोधत तिथे पोचलो. पुणेरी वाडा टाइप घर होतं. लाकडी जिना ,मुख्य खोलीत पोचाच्या आधी छोटासा बोळ ,शहाबादी फ़रशी. आतल्या खोलीत ३ लाकडी टेबलं आणि
बाक होते. १ वयस्कर माणुस वाढत होता. आत गेल्या गेल्या कानडीतुन काहीतरी बोलला .. दोनच शब्द बाकी हावभाव. ते "चप्पल बाहेर" असं होतं .. आता असं पुणेरी वाडा टाइप वातावरण म्हटल्यावर माणुसही तसाच असणार .. जेवणाच्या शेवटी वाढायला भात घेउन आले.
सागर नुसताच वाट बघत होता .. मग ते म्हणाले "वाटी" .. त्याला काही कळेना आणि मी त्याच्याकडे होतो .. मग १दम वसकले "वाटी काढली नाही तर भात कुठे वाढु ?" मला जाम हसु येत होतं .. मग त्याला वाटी काढायला सांगुन त्यानी वाटी काढल्यावरच भात वाढला त्यानी ..मी
आधीच सावध होऊन वाटी बाहेर काढुन ठेवली होती. साग्या खरोखर serious होउन मला म्हणतो "विनाकारण कोणी माझ्यावर ओरडलेलं मला आवडत नाही" मी परत ख्या ख्या करुन हसलो ... जेवुन घरी आल्यावर गादीवर पडल्या पडल्या zzzz ...

९-०६-०८
सकाळी अरामात उठलो. उठेपर्यंत सोलर हीटरचं पाणी कोमट झालं होतं.उठुन आवरुन काही खायच्या मंदीरात जाउन यायचं ठरलं. सकाळी हवा १दम प्रसन्न होती. मंदीरात गेल्यावर उगचंच चार्जड झाल्यासारखं वाटंत होतं. मंदीराची जागा छान आहे.
बाजुलाच १ तलाव आहे आणि त्यात कुठलीही भेसळ नसल्यामुळे वास वगैरे काही नाही. थंड हवा वहात होती ढगही आलेले होतेच. गेल्यावर लगेच guide ठरवुन टाकला. मग त्यानी सांगायला सुरुवात केली. हळेबीडचं हे मंदीर होयसाळा राजाच्या

अमत्यानी बांधुन घेतलं होतं .. म्हणजे सुरुवात केली होती. १२व्या शतकात हे मंदीर बांधायला सुरुवात झाली. मंदीर पुर्ण म्हणजे आता दिसतं तसं व्हायला १९० वर्ष लागली. ५ पिढ्या हे मंदीर बांधत होत्या.एवढं होउनही मंदीर पुर्ण झालं नाही.

मुघलंनी(गझनीचा महमूद) इथे हल्ला केल्यावर कारगीरांना काम सोडुन पळावं लागलं.मंदीराचं बाहेरचं काम पुर्ण झालं आहे पण आतलं बरयापैकी अपुर्ण आहे.हळेबीडचं मंदीर हे आतल्यापेक्षा बाहेरुन सुंदर आहे त्याउलट बेल्लुरचं मंदीर हे आतुन जास्त सुंदर

आहे.हे मंदीर सोप्स्टोन वापरुन बांधलय. हा दगड म्हणे कोरीवकाम करायला सोपा असतो आणि वातवरणात एक्सपोज झाला की कठीण होत जातो.पुर्ण मंदीर हे दगड १मेकावर रचुन बांधलय. कुठलंही binding material न वापरता.
मंदीरातला कोरीव काम अतिशय नाजुक आणि सुंदर आहे. म्हणजे गळ्यात जर दोन हार असतील त्या दोन हारात खरच अंतर आहे म्हणजे फ़क्त दृष्य भाग नाही तर मागुनही ते व्यवस्थित कोरलेले आहेत.त्यातली १ मुर्ती आहे तिच्या चेह-यावर एवढं मस्तं

smile कोरलेलं आहे कि बघुन दंग व्हायला होतं.तशीच १ मुर्ती आहे नर्तिकेची .. तिच्या चेहे-यावर रुपाचा असणारा गर्व लगेच दिसतोच.बाकी
मग दृष्य जी सगळीकडे कॊमन असतात म्हणजे रामायण,महाभारत आणि दशावतार जे सगळ्या

ऐतिहासीक कोरीव कामांमध्ये हमखास सापडणारच. मंदीराच्या मुळ प्रवेशद्वारापाशी होयसाळांच राजचिन्ह आहे ते म्हणजे १ मुलगा काठीनी सिंहाशी लढतोय असं. त्याची गोष्ट अशी ..
एकदा १ मुनि मुलांना काहीतरी शिकवत होते.. तेव्हा तिथे अचानक १ सिंह आला .ते पाहुन सगळे विद्यार्थी पळायला लागले फ़क्त १कच तिथे थांबला सिंहाशी लढायला..तेव्हा गुरुजींनी त्याच्याकडे काठी फ़ेकली आणि म्हणाले होय(मार) साळा(विद्यार्थ्याचे

नाव). मग त्या मुलानी त्या सिंहाला मारलं (अर्थातच !! जर सिंहानी त्याला मारलं असतं तर त्यांचा वंश पुढे कसा गेला असता) .. आणि तोच ह्या घराण्याचा मुळपुरुष. हे लोक मुळचे जैन पंथाचे पण क्षत्रिय वृत्तीच्या जबाबदा-यांमुळे ते शैव झाले

का वैष्णव झाले. ते लक्षात नाही आता :( .हे मंदीर पाहुन झाल्यावर जवळच असलेलं १ जैन मंदीरही पाहुन घेतलं. राजाची राणी ही जैनच राहिली आणि तिनी हि मंदीरं बांधुन घेतली.जैनमंदीरं पाहुन आणि पोटपुजा आटोपुन आम्ही लॊज सोडलं आणि

बंगलोरकडे परत यायला निघालो.हासनहुन पुढे NH-48नी बंगलोरकडे येताना चन्नारयणपटणानंतर उजवीकडे गेलं की बाहुबलीची सर्वात उंच मुर्ती असणारं मंदीर आहे. वळुन थोडं पुढे गेलं की १का मोठ्या टेकडीवर ही मुर्ती दिसायला लागते.
टेकडीच्या पायथ्याशी गाडी लावली. पायथ्यापाशी cloak room वगैरेची सोय आहे. टेकडीला वरपर्यंत पाय-या असल्या तरी वर चढेपर्यंत चांगलीच दमछाक होते. पण आम्ही नेटानी १ दमात वरपर्यंत गेलो.वर गेल्यावर थंडगार वारं लागायला

लागतं. असं दमल्यावर तर कोणालाही तिथल्या १खाद्या झाडाखाली ताणुन द्यावी लागेल. आम्ही झोपलो नाही ते सोडा.मंदीराकडे यायच्या रस्त्यावर असलेलं हिरव्यागार पाण्याचं तळं वरुन नेट्कं आणि सुरेख दिसतं. मंदीरात थोडा वेळ घालवुन खाली

उतरलो. उतरल्यावर बंगलोरच्या दिशेनी निघालो. वाटेत १का ठिकाणी रस्त्याचं काम चालु आहे तिथे १का बाजुला मातीचा मोठा रस्ता आहे.तिथे गाडी लावुन पहुडलो .. गाडीचा आणि आम्हा तिघांचा १त्र पहिला फोटो तिथेच काढला.. ह्याची दृष्ट

लागाणार आहे हे काय माहित होतं ... इथुन सागरनी गाडी चालवायला घेतली. कुणीगलच्या ५-६ किमी आधी गाडी बंद पडली. किक मारुन पाहिली गाडी ढिम्म .. मग वाटलं नविन engine आहे तापलं असेल. सुदैवानी १का घराजवळ बंद

पडली होती. त्या घरातनं पाणी मागुन घेतलं आणि सागरसेठच्या diesel गाडीच्या exp.वरुन engineवर हलके हलके पाणी मारुन ते गार केलं. परत किक/बटन स्टार्ट ट्राय करुन पाहिलं पण engine अजुनही ढिम्मच ..आता काय

.. tool kitचं उद्घाटन केलं .. स्पार्क प्लगला ठिणगी येतिये का ते पाहिलं पण उहु .. मग हे हाताबाहेरचं प्रकरण आहे असा ठराव पास केला. घरातल्या १कानी गाव जवळच आहे असं सांगीतलं आणि गावातला मेकॆनिक ठिक करुन शकेल

असं सांगीतलं .. मग सागरला अजिबात कन्नड येत नसुन त्याला तुच गावात जा असं सांगीतलं .. कारण मी इरेला पेटलो होतो .. एवढी नविन गाडी जिची सतत स्तुती करतोय ती असं करुच कसं शकते .. त्याला पाठवलं आणि खटाटोप सुरु

केला. सागरला जाउन बराच उशीर झाला तरी साहेब येइनात .. फोन करावा म्हटलं तर नेट्वर्क नाही.फोनची बॆटरी संपत आलेली. त्यांमुळे नेटवर्क नसलेल्या ठिकाणी चालु ठेवण्यातही पोईंट नव्हता. घरातल्या १ सद्ग्रुहस्थानी मला १का झाडापशी नेलं

आणि म्हणे इथे n/w आहे. खरोखरच तिथे n/w होतं तिथुन साग-याला फोन टाकला. त्याल मेकॆनिक मिळाला होता.त्याला नेणार रिक्षावालाही भारी निघाला .. साग्यानी त्याला "कन्नड इल्ला" सांगितलं आणि गॆरेज असं सांगितल्यावर त्याने

ह्याला correct ठिकाणी आणुन सोडलं ..आणि पैसेही घेतले नाहीत(ह्याना बंगलोरला आणा रे कोणीतरी प्लीज) .. गडद काळोख झाला होत एव्हाना .. शेवटी १दाचा सागर आला. आलेल्या दोघानी थोडी खटाटोप करुन पाहिला पण त्यानाही

अंधारात काम करणं जमेना .. मग गाडी Tempoत टाकुन गावात न्यायचं ठरलं. मग tempo बोलावला ..मनातुन एवढा प्रचंड चिडलो होतो मी ... रक्तपात करावा असं वाटत होत तिथल्या तिथे.गावात १कच माणुस होता ज्याला बुलेटचं काम

करता येत होतं .. पण नेमकं त्याचं दुकान बंद .. मग परत गाडी जुन्या मेकॆनिककडे .. तिथे असा निष्कर्ष काढला त्यांनी की गाडी इथेच लावावी .. आणि दुस-या दिवशी बंगलोरहुन जो खराब झालेला पार्ट असेल तो घेउन यायचं.हे तर मी करणं

अशक्य होतं .. परत तोच tempoवाला बोलावला .. आणि गाडी tempoमध्ये टाकुन इकडे आणायचं ठरलं.एव्हाना रात्रीचे १० वाजले होते. मनस्ताप आणि श्रम ह्यामुळे खुप थकवा आला होता.दुपारनंतर काही खाणं झालं नव्हतं. गाडी

चढवायला त्या गॆरेजवाल्यानी मदत केली.त्याच्याकडे दोरी नव्हतीतर गाडीवरुन कुठेतरी जाउन दोरी घेउन आला.गाडी बान्धुन दिली आणि म्हणाला 'कुछ फ़िकर नक्को करो आरामसे सो जाओ अब गाडीक कुछ नई होता' एवढ सगळं त्यानी केलं म्हटल्यावर

त्याला काहीतरी पैसे देउ केले पण तो म्हणाला गाडी ठिक नही हुइ पैसे किस चीज़ के लेंगे ?? १कीकडे गाडीमुळे झालेली चिडचिड आणि दुस-या बाजुला अशी निरपेक्ष मदत करणारी लोकं .. हे आमच्या ऋण होतं .. कधीही कुठेही कोणालाही कसलीही

मदत लागली तर दिलीच पाहिजे .. hats off to those guys !!! tempo शेवटी ११:३० -१२ च्या सुमारास घरी पोचलो. काहीच कारायचा मूड नव्हता. थोडसं काहीतरी खाउन झोपलो.
ट्रीप अशी संपेल असं अजिबात वाटलं नव्हतं.. पण असं सगळं झालं तर काहीतरी वेगळं(नेहेमी नेहेमी नाही .. कधी कधी हा .. नाहीतर त्या वास्तुपुरुषाला नको तेव्हा तथास्तु म्हणायची सवय असते). तर ट्रीप इथे संपली ..


पण पुढे लिहीलंच पाहिजे ...सकाळी उठुन showroom ला फोन केल्यावर त्यानी service centerचा फोन दिला. फोन केल्यावर २०व्या मिनिटाला मेकॆनिक हजर होता .. त्यानी आम्हाला नविन माहिती दिली ..
आम्ही गाढव असल्याची .. "royal enfield gives free service for 1 year at any place and that to the service is 24hr service..
why didn't you give us a call from kunigal .. we would've come and brought ur vehicle here .. and thats without any cost, and

this kind of breakdown is on highest of the priorities.if we don't serve well we get commands from chennai head office.u can

check that on i-net" मनातल्या मनात स्वत:ला जोड्यानी हाणलं. अजुन दोन माणसाना बोलवुन ते लोक गाडी घेउन गेले. मीही गॆरेज बघायला म्हणुन बरोबर गेलो .. त्याच्या बुलेट्वरुन उतरताना माझी jeans कशाततरी

अडकुन फ़ाटली !!! time खराब और क्या म्हणलं आणि घरी आलो.. दुस-या दिवशी गॆरेजमधुन फोन आला की अश्याप्रकारचा problem पहिल्यांदाच report केला गेला आहे .. आणि आम्हाला तो का आला ते शोधुन

company-ला सांगावं लागेल(चला at least इथेतरी unique आहोत आपण) .. म्हणुन आम्ही गाडी आजचा दिवस test करुन उद्या परत
देतो ..आणि शेवटी ती गाडी परत आली सुखरुप ... अजुनही ही गाडी मला तेवढीच

आवडते .. आणि आवडत राहील.. आपलं माणुस आजारी पडलं तर नावडतं होत नाही ना तसंच ..इतके किमी गाडी चालवली पण १दाही जरा थांबुन पाठ मोकळी करावी असं वाटलं नाही ..
म्हणुनच .. म्हणुनच ही गाडी .. माझी डेक्कन ओडिसी !!!