Wednesday, May 02, 2007

चित्रदुर्ग आणि हंपी

काविळ झाल्यामुळे गेले ४-५ महिने काही करता येत नव्हतं. ना कुठे जाणं ना व्यायाम ना बाहेरचं खाणं नुसतं गुळाची ढेप झाल्यासारखं वाटंत होतं कोपयात पडुन असणारी ..किडामुंगी येउन चावले तरी काही न करता येणारी. नुसती चीडचीड होत होती.
शेवटी ते bilirubin १दाचं normal ला आणि कपळावरचा घाम येणं बंद झाल्यासारखं वाटलं.

मग १टंच जायचं ठरवलं म्हणजे मला १टं फ़िरायला आवडतं. कोणाला विचारणं नको कुणाचं ऐकणं नको .. जिकडे पाहिजे जेंव्हा पाहिजे जसं पाहिजे तसं फ़िरायचं किंवा बरोबरचे लोक असे पाहिजेत कि त्यानाही त्या वेळेला तसंच वाटावं. ज्याना विचारलं ते मित्र तसेच पण त्याना नाही जमलं. हंपीला जायचं मी जवळ जवळ नक्की केलं होतं. माझ्या बयाच fantacies पैकी १ म्हणजे .. डोक्यावर जबरदस्त म्हणजे १दम कवटीतोड(ते भरपुर उष्णतेनी प्रेताची कवटी फ़ुटते ना तेव्हढं गरम) उन्ह असावं .. आजुबाजुला सगळं ओसाड पिवळंशार असं माळरान लांब-लांबपर्यंत चिट्पाखरुसुधा नाही आणि खाली मस्तं काळाकुळीत रस्ता .. त्या रस्यावरुन कित्येक किमी गाडी पळवत न्यायची. ते cowboy movies मध्ये असतं ना वाळवंट आणि त्यात रस्ता .. मळलेली jeans आणि कपड्यावर धुळ. आता हे काही ते picture बघुन सुचलेलं नाहिये .. मला लहानपणापसुन तसंच आवडतं .. कदाचित माझ्या बाबाना तस आवडंत असल्यामुळेही असेल. ह्या season मध्ये हंपीच्या आसपासचा भाग असाच आहे असं कळल्यावर मग तर जायलाच पाहिजे. मग बाजारात जाउन ग्लोज वगैरे आणले.मागच्या ट्रिप मध्ये घासली गेलेली jeans काढली आणि done !!
३०-०४-०७
आदल्या दिवशी रात्री c-dac चा आमचा सगळा group घरी आला होता मग त्यांच्याबरोबर मॆच बघत बसलो आणि रात्री झोपायला १ वाजला. मग सकाळी ४:३० ला उठलो .. आणि आवरुन म्हणजे आंघोळ दुध (त्याशिवाय शक्य आहे का ? ;-))
वगैरे करुन ५ वाजता घरातुन बाहेर पडलो... १ मित्राला airport वर टाकलं आणि trip meter reset करुन निघलो...
सकाळी नेहमीच मस्त हवा असते बंगलोर ला. सकाळी थोडासा अंधार असल्यामुळे गाडी concetration नि चालवावी लागते.
त्यात परत डोक्यात कुठले विचार सुरु झाले तर अवघड असतं समोर काय आहे आपण कुठे आहोत काही कळत नाही अचानक जाग आल्यासारखं होतं आणि कळतं आता जय हो व्हायची वेळ आली असती मग त्यानंतर कटाक्षानी फ़क्त गाडी चालवण्याकडे लक्ष देउन गाडी चालवायला लागलो. बंगलोर मधुन बाहेर पडुन NH-4 ला लागायचं आणि पुढे चित्रदुर्ग पर्यन्त ह्याच रस्त्यानी जावं लागतं. NH-4 सारखा दुसरा रस्ता नाही. ४ lanes आणि काही ठिकाणी ६ lanes सुधा ..आणि सकाळची वेळ असल्यामुळे १दम कमी traffic. बर्याच लांबपर्यंत सगळं काही दिसतं त्यामुळे गाडी कितीही वेगात पळवता येते आणि ह्यावेळेला वार्याची दिशाही बरोबर असल्यानी १०० चा स्पीड गाडीनी पहिल्यांदाच पाहिला आणि उतारावर थोडा वरचाही :D ..मध्येच १का ठिकाणी मस्तं पसरलेलं सुर्यफुलाचं शेत दिसलं तिथे थांबुन त्याचे फोटो काढले
.. तिकडुन १ माणुस मला आवाज देत काहीतरी सांगत होता ..
मला तो काहीतरी चिंधीगिरीसाठी आवाज देतोय हा अंदाज आलाच पण म्हटलं थांबुन बघावं काय म्हणातोय ते आला आणि म्हणाला पैसे द्या फोटो काढला त्याचे ... त्याला शिव्या घातल्या कचकचुन .. हया लोकाना वाटतं काय ?? कानावर बिड्या ठेवुन फ़िरतो काय मी ... फ़ालतु साले. मग तिथुन पुढे निघालो. बंगलोर पासुन साधारण १३० किमीवर कामतांचं हॊटेल आहे. मी काही न सांगता गाडी मला तिकडे घेउन घेली. मि अजिबात काही बोललो नाही .. गाडी मला घेउन direct हॊटेलात. आता एवीतेवी आलोच आहोत तर काहीतरी खाऊन घेउ म्हणुन .. तिकडे पोचेपर्यंत ७:१५ वाजले होते. तिकडचं आवरुन पुढे चित्रदुर्गकडे निघालो. साधारण १० च्या आसपास कधीतरी चित्रदुर्गला पोचालो. तिथे माझ्या मोडक्या तोडक्या कानडीत चित्रदुर्ग कुटहे आहे विचारत होतो. १-दोघानी रस्ता सांगीतला आणि तिकडे पोचल्यावर विचार म्हणाले त्या रस्त्यावरच्या माणसाला फ़ोर्ट काय ते झेपेना .. मग त्यानी तो कोटे(किल्ला) कुठे आहे ते सांगितल. किल्ला दिसायला तरी मस्तं दिसत होता (कशाला पटकन चांगलं म्हणायला काही जमणार नाही ना :D). मी मागे म्हणालो होतो ना कि कुठेही गेलो तरी कोणीतरी मरठी मला भेटतंच. तिथे किल्ल्यापाशी फोनवर बोलताना १का बाजुच्या कारमधल्या माणसानी बोलणं ऐकलं आणि बोलावलं मला .. आणि कित्येक वर्षापासुन ओळखत असल्यासारखा गप्पा मारायला लागला कसं काय कुणास ठावुक. आजकाल हे मी असं बयाचदा अनुभवतो. तुम्ही स्वत: जर अतिशय खरे आणि स्पष्ट असाल ना तर आजुबाजुचं सगळं १दम प्रसन्न झाल्यासारखं वाटतं म्हणजे लोकं तुम्ही सांगाल त्यावर लगेच विश्वास ठेवतात आणि फ़ार चांगलं वागतात लोकाना पाहिल्यावर प्रसन्न किंवा secured वाटत असाव. काही काही माणसं असतात ना की ज्यांच्याकडे पाहिल कि आपोआपच आपल्याला चांगलं feeling येतं हिच ती energy काय म्हणातात ती असावी .. अवतीभवती असणारी .. अश्या लोकांकडे पाहिलं कि आपल्यालाही आपण जे समोर येइल ते आरामात झेलु असं वाटतं. आपण स्वत: एवढं positive खरं व्हावं असं नेहमी वाटतं. लोकाना energy देण्याएवढं. हेच वलंय असावं ते देवदेवतांच्या मागे असतं ते किंवा मग ह्यामुळेच ते देव झाले असावेत का तसलंच काहीतरी. मी १टंच निघायचं ठरवलं तेंव्हा माझ्या १का roomate नी विचारलं अरे गाडी puncture झाली तर .. म्हटलं तसं होणार नाही कारण हा विचार कधी जवळपासही आला नाही. १खाद्या गोष्टीबद्दल जर तुम्ही १००% positive असाल तर ती होतेच. ते राहुदे ....
हा तर मग त्या माणासानी मला साजुक तुपातली शंकरपाळी वगैरे खायला दिली. ते झाल्यावर मी किल्ल्यात गेलो. नायक लोकांचा किल्ला आहे तो. हे नायक लोक खरतर मंगलोरचे पण इथे येउन साधारण २००वर्ष राज्य केलं. हे मंगलोरी लोक भारी आहेत सगळे शेट्टी,राय ;-), नायक , तो दया नायकही तिथलाच ना. काही वर्ष ते नामधारीही होते. हंपीच्या राय लोकांना कर देत होते. कर्नाटक सरकारनी सगळी प्रेक्षणीय स्थळ छान maintain केली आहेत. किल्ला १दम सुस्थितीत आहे. तिथे १ guide घेतला आणि किल्ला बघयला सुरुवात झाली. सकाळचे १० वाजले होते आणि मस्तंपैकी तापायला लागलं होतं. किल्ल्याचा विस्तार प्रचंड आहे. पाणी वगैरे साठवायला टाकी वगैरे आहेत. ती overflow झाल्यावर ते पाणी कुठे आणि कसं divert करायचं ह्याची उत्तम arrangement आहे. किल्ल्यावर त्या गावाचं ग्रामदैवत आहे. दरवर्षी त्याची जत्रा असते आणि अजुनही तिथे रेडा बकयांचा बळी देतात आणि तो प्रसाद सगळे लोक खातात. आपल्या इथे कुठेतरी ती मांगीरबाबाची जत्रा असते ना तसलाच प्रकार. जसं कुठलही कारण काढुन दारुन प्यायची तसंच कोम्ब्ड्या बोकडं कापायची. तो किल्ला फ़िरता फ़िरता घामातुन १०० लिटर पाणीतरी संपलं असेल. तो guide ही धापा टाकायला लागला होता. त्याला तर continuous काहीतरी बोलणं भाग होतं. ह्या किल्ल्यावर उब्बव्वाची
खिंड म्हणुन १ जागा प्रसिद्ध आहे. आपल्याकडे जसा हिरकणीचा बुरुज तसंच. त्याची गोष्टं अशी ..
हैदरलीनी तो किल्ला बर्याचदा घ्यायचा प्रयत्न केला पण त्याला काही ते झेपेना. मग कोणी फ़ितुर वगैरे होतं का ते पहायचा प्रयत्न सुरु झाला. ह्या नायक लोकानी सगळ्या किल्ल्याना असतं तसला १ चोर दरवाजा केला होता. आणि युद्धाच्या काळात तिथुन फ़क्त काही मोजकीच लोकं ये जा करु शकत होती. त्या किल्ल्यावर दही पोचवणार्या १का बयेनं त्याच्या फ़ौजेला तो दरवाजा दाखवला.
त्याच वेळेला हि उब्बवा तिच्या नवर्याला जेवायला वाढुन पाणी आणायला ह्या खिंडारापाशी आली. तिला हैदर-अलि चे सैनिक आत येताना दिसले. तेव्हा ही त्या खिंडाराशी १ मुसळ घेउन उभी राहिली आणि येणार्या सैनिकांना त्या मुसळानी मारलं. जेवायला बसलेल्या नवर्याच्या जेवणात अडथळा येउ नये म्हणुन ती स्वत: लढायला उभी राहिली. बराच वेळ बायको येत नाही म्हणुन हा बिगुल वाजवुन वर्दि देणारा नवरा उठला आणि बायकोनं मांडलेलं ते महाभारत पाहिलं. त्यानी लगेच बिगुल वाजवलं आणि मग ते सगळे पुढचे सोपस्कार होऊन नायक जिंकले पण ही उब्बव्वा मेली. म्हणुन त्या खिंडाराचं नाव ओणके उब्बव्वा खिंडी.
बघा त्या वेळच्या बायका....
हे सगळं बघुन होइपर्यंत दुपारचा १ वाजला होता. वरती उन्ह प्रचंड तापलं होतं. १ दाट सावली असणारं झाड शोधलं १ लिटरची ती real active ची बाटली रिकामी केली आणि मस्तं झोप काढली तासभर. झोपुन उठल्यावर जेवणासाठी वगैरे न थांबता हंपीच्या दिशेला निघलो. चित्रदुर्ग पासुन NH-4 आणि NH-13 वेगळे होतात. हंपीकडे जाण्यासाठी NH-13 नी जावं लागतं. हा रस्ताही छान आहे. फ़क्त चौपदरी नाहिये आणि ह्या रस्त्या ट्रक्सची प्रचंड traffic आहे. जसं जसं हम्पीच्या जवळ पोचायला लागलो तसं उन आणखी प्रखर आणि रखरखाट वाढत जातो. त्यात गाडी contuniously एवढ्या स्पीडनी पळवत होतो की आता engine वितळुन जाइल असं वाटायला लागलं but its pulsar.. i just love this bike ... robust and sturdy. १का ठिकाणी सावली बघुन थांबलो. नाकाचा शेंडा लालबुंद झाला होता. तोंडावर आणि डोक्यावरच्या फ़डक्याला ओलं करुन परत बांधलं आणि निघालो.
हंपीच्या अगदी जवळ पोचल्यावर रस्त्याचा डाव्या बाजुला तुंगभद्रा डॆम दिसतो. पाणी कमी असलं तरी आधी ज्या ठीकाणी पाणी होतं तो सगळा भाग हिरवंगार कुरण झाला आहे. गवताचं backwater असल्यासारखा पसरलेला. त्या रखरखाटात हे हिरवं गार कुरण बघितलं कि १दम कानात तेल सोडल्यावर कसं थंड वाटतं ना तसं वाटतं. त्याच रस्त्यानी पुढे गेल की हंपीमध्ये जाण्यासाठी NH-13 सोडुन उजविकडे वळावं लागतं. ह्या फ़ाट्यापासुन होस्पेट ६ किमी आहे. होस्पेट मध्ये शिरताना हंपीची direction दाखवणारी १ पाटी दिसते त्यानंतर सगळ्या पाट्या गायब. त्यात परत होस्पेट मध्ये ३-४ १वे आहेत. मग परत कानडी जिन्दाबाद. विचारत विचारत होस्पेटमधुन बाहेर पडलो आणि हंपीच्या रस्त्याला लागलो. होस्पेट ते हंपी १२ किमी आहे. ह्या रस्तावर सगळ्या उध्वस्त जिर्णोद्धार केलेल्या आणि काही सुस्थितीतल्या अश्या गोष्टी दिसायला सुरुवात होते. शेवटी ४:३० च्य सुमारास हंपीला पोचलो. मी तिथे पोचलो त्यावेळेल १तर off season आणि दुपारची वेळ त्यामुळे कोणी दिसत नव्हतं. न विचारयला कोणी न कुठे हॊटेल .. जाम वैतगलो. गाडी पार्क करुन १का झाडाखलच्या कटट्यावर जाउन बसलो. उगाच चिडचिड करतोय .. काय हे.. निट पाट्या ना कोणी माणुस त्यात कानडीही निट येत नाही .. तेवढ्यात लांबुन १ foreigner येताना दिसली japanese असावी .. म्हटलं हि लोकं कुठनं येतात ह्याना कानडी काय धड englishahi येत नाही मग मी का चिडचिड करतोय .. बसु थोडा वेळ आणि मग बघु हा विचार यायला आणि १ माणुस तिथे यायला १कच गाठ पडली. तो आला आणि विचारलं कि रूम होना क्या ? त्यानी १दम ४०० रुपये सांगितले १का रूमचे. मग घासाघिस करुन त्याला बरंच खाली आणलं and deal was finalized. रूमवर गेलो आणि पंखा लावुन गुडुप. उठल्यावर आंघोळ केली. तोपर्यंत हॊटेलमधला मुलगा आला होता .. तो मला तिथलं हॊटेल दाखवायला आला. तिथे mango tree नावाचं १ सुरेख restaurant आहे. तुंगभद्रा नदीच्या काठी .. १का मोठ्या आंब्याचा झाडाखाली चटया अंथरलेल्या असतात. मस्त झाडाखाली चटईवर बसुन जेवायचं आणि
त्या हॊटेल्च्या जवळ गाडी नेता येत नाही. गाडी लांब पार्क करुन ठेवायला लागते. तिथुन पुढे चालत .. दोन्ही बाजुला भरपुर केळीची झाडं.तिथे जाउन यथेच्छ जेवलो. तोपर्यंत अंधार पडायला लागला होता. परत रूम वर गेलो कपडे बदलले आणि भटकायला बाहेर पडलो. नदीच्या काठी मंडपासारख्या बरयाच जुन्या वास्तु आहेत .. त्यातल्या १किच्या छ्परावर जाउन पहुडलो वरती लख्खं चांदणं पडलं होतं नदीच्या पाण्याचा हलकसा आवाज येत होता आणि गाव हळु हळु झोपायला लागलं होतं. आजुबाजुला चिटपखरु नाही. परत कोणी विचारायला नाही इथे का थांबला वगैरे .. नहितर पोलिस लोकांना अश्या वेळी येउन चौकश्या करायची फ़ार हौस असते.तर सुदैवानी तसं काही झालं नाही आणि मुख्य म्हणजे डासही अजिबात नाहीत. संथ वाहते कृष्णामाई गाणं आलं ओठावर ... बराच उशिर झालाय असं कळल्यावर रूमवर आलो. wiki वरुन काही प्रिंटाऊट आणल्या होत्या त्या वाचत बसलो. दुसर्या दिवशी बघण्यासारखी कुठली ठिकाणं आहेत ती बघितली. कुठुन कसं जायचं ते ठरवायचा प्रयत्न केला शेवटी travelling salesman problem सारखं हेही सरळ नाही ते कळलं आणि दिवा बंद करुन साधारण ११ च्या सुमारास झोपलो.

०१-०५-०७

सकाळी ५:३० ला उठलो ६ वाजेपर्यंत सगळं आवरुन बाहेर पडलो. सगळ्यात आधी विरुपाक्ष मंदिरात गेलो. मंदिरात सकाळी
सकाळी आरती आणि दर्शनासाठी बर्यापैकी गर्दी होती. मंदिरात १का बाजुला pinhole camera असतो ना तसलाच १ प्रकार आहे ज्यामुळे सकाळी सकळी त्या मंदिराच्या गोपुराची invered सावली १का भिंतीवर पडते. तिथुन निघुन मंदिराच्या समोरच्या बाजुला असलेल्या monolith नंदीची मुर्ति आणि इतर काही पडकी आणि काही सुस्थितली मंदिरं बघत निघालो. थोडं पुढे आल्यावर १का बाजुला नदी आणि दुसर्या बाजुला मोट्ठ मैदान ज्याच्या दोन्ही बाजुला पडके अवशेष दिसतात. त्यावरुन विजयनगर हे किती मोठं आणि सामर्थ्यशाली राज्य असेल त्याची कल्पना येते. आणि ह्या असल्या राज्याची अल्लौद्दीन खिल्जी तुर्कस्तानातुन येउन धुळधाण उडवतो. आपले लोक कधी स्वत:हुन लढायला कुठे गेलेच नाहीत का ? स्वत:ची सत्ता राखता राखताच आपल्या नाकी ९ आले. हे aggression जिंकायची प्रव्रुत्ती genes मध्येच आहे का ? आपली लोकं समुद्रापरही कधी गेल्याचं मलातरी माहित नाही.
याउलट ते europian लोक छोट्या होड्यातुन पार कुठेच्या कुठे गेली ... १ राजाशिवछत्रपती येतो .. १कच ... देवच .. कुठे डावं उजवं नाही . अजुनही आपण ह्या इतिहासाच्या गोष्टी लोकाना सांगुन आम्ही मोठे म्हणातो. सध्याची परिस्थिती काय ? मध्ये १ पुस्तक दाखवलं बाबानी त्यात संस्कृतमध्ये असलेले वैद्नानिक श्लोक दाखवलेत, उपनिषदांमधले. ते वाचुन थक्क झालो .. तोपर्यंत मी संस्क्रुत म्हणजे सुभाषितं आणि तत्वद्नान सांगणारी भाषा असंच समजत होतो. त्यात newton चे नियम pythagoras चा सिद्धांत सगळं आहे. मग इतर कुठली असंबद्ध सुभाषितं शिकवण्याऐवजी हे श्लोक का नाही शिकवले जात शाळेत ? असा विचारंचा गोंगाट वाढायला लागला .. कानाच्या पाळ्या गरम व्हायला लागल्या .. आणि अचानक त्या विचारांचा आवाज बर्याच जोरात यायला लागला ... आणि ते अचानक चावले मला , मग समजलं कि कानाला माशी चावली :D आणि थोड्या वेळात कानाचा कर्णा झाला. तिकडचा भाग बघुन झाल्यावर कमळापुर च्या बाजुला असलेली मंदिरं आणि अवशेष पहायला निघालो. सगळ्यात आधी लागतं ते नरसिंहाचं मंदीर उघड्यावर असुनही सुस्थितीत असलेलं आणि त्याच्या बाजुला १ मोठी शंकराची पिंड आहे. तिथुन थोड्याच अंतरावर दोन प्रचंड मोठ्या शिळा १मेकीना टेकुन उभ्या आहेत.
ह्या भागात एवढे प्रचंड मोठे बोल्डर्स आहेत म्हणजे टेकड्याच आहेत छोट्या. rock climbingचं वेड असणार्या लोकांसाठी ह्यापेक्षा भारी जागा नाही. हात नुसते शिवशिवत होते.
एव्हाना उन्ह मस्तं तापलं होतं. त्या तापलेल्या उन्हात हे पडझड झालेलं बांधकाम मस्तं दिसत होतं.
मधला परिसर बघत बघत विठ्ठल मंदीरापाशी पोचलो. ह्या मंदीराजवळचा रस्ता कच्चा ,मातीचा आहे. दोन्ही बाजुला दगडी खांब आणि सरळ्सोट रस्ता. रस्त्यावरच उजव्या बाजुला १ तळं आहे आणि तळ्यात छत्री आहे. त्या तळ्यात अगदी नावापुरतं हिरवं पाणी होत. सहज त्या तळ्यापाशी गेलो तर त्यात १ कासव होतं. त्याचा फ़ोटो काढायला गेल्यावर लगेच आत गेल. असं नैसर्गिक राहणारं कासव मी पहिल्यांदाच बघितलं. अगदी छोटं होतं... पिलु होतं का तोच त्याचा साइझ काय माहित. ह्याच विठ्ठल मंदीरात ते सात स्वर काढणारे प्रसिद्ध खांब आहेत. पण मी गेलो तेम्व्हा ते डागडुजीसाठी बंद केले होते. आता ते बघायला परत हम्पीला यावं लागणार :D . तसं अजिंठ्याच्या लेणीत मी बघितलंय ते पण ते बघीतलं म्हणुन हे बघितलं नाही तर चालतं असं कोण म्हणालय !! असो तर त्या विट्ठल मंदिराच्या मागच्या बाजुला तुंगभद्रा वाहते तिच्याकाठी काही गुल्मोहोराची लालभडक झाडं आहेत. ह्या असल्या उन्हात पाहिल्यावर त्यांना फ़्लेम-ट्री का म्हणतात ते कळतं. हे सगळं बघुन होइपर्यंत दुपारचा १ वाजला होता.
१ वाजता परत रूम कडे कूच केलं. रूमपाशी काही मुलं त्या उन्हात जमीनीवर गोट्या खेळत होती. फ़िर अपन मानते क्या .. सॆक रूमवर टाकुन लगेच खेळायला .. मग त्या मुलांशी तेवढंच लहान होऊन गोट्या खेळलो. अगदी भांडुन वगैरे. ते कानडीत मी मराठीत. अर्धा तास वगैरे खेळल्यावर हाताच तळवा लाल्बुंद झाला होता. आपल्या १०-२० सारखा खेळ .. राजा राणी किंवा गोट्या लावुन खेळलो असतो तर झालंच असतं. अर्धा तास ढोपरानी गोटी ढकलत किंवा सगळ्या गोट्या हारुन परत. हा खेळ होईपर्यंत प्रचंड दमलो होतो. रूमवर जाउन न जेवताच झोपलो. साधारण ४ वाजता उठलो आणि direct mango tree restaurant. 1 मॆंगो लस्सी आणि mango tree special थाळी. ह्या वेळेला बरेच foreigners तिथे येउन बसले होते म्हणजे सगळे foreignersच होते. मग २ australian कुठे जागा नाही पाहुन माझ्या चटईवर येउन बसल्या. मी मठ्ठासारखं काही न बोलता order ची वाट बघत बसलो. साधे manners नाही कळत. कोणी बाहेरुन आलंय आपल्याकडे आलंय hi, hello how r u ? एवढं म्हणायचं ही सुचत नाही म्हण्जे कमाल आहे. शेवटी त्यानीच विचारलं r u travelling मग मला कंठ फुटला. काय कश्या आहात ? कुठुन आलात? ur team won congrats .. so how was hampi 4 u ... 1 of them was music teacher n other was maths teacher .. both the fields so closely related to each other n so were the two. दोघीही नोकरी सोडुन फ़िरायला बाहेर पडल्या होत्या. काय बिनधास्त राहतात हे लोक. त्यांच्याकडे नोकर्या आरामात मिळतात म्हणुन का त्यांचा स्वभाव तसा म्हणुन त्यांच्याकडे नोकर्या मिळणं एकंदरीत सगळंच सोपं .... chiken egg problem ..पण माझ्या मते ती लोकं बिनधास्त असतात म्हणुन त्यांच्याकडे सुबत्ता आणि security असते. जसं १खाद्या उधळ्याला पैसे मिळतच राहतात तसं ...
१ छान श्लोक आठवला .. अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च, अजापुत्रो बलिम दद्यात देवो दुर्बलघातका ॥
दैव सुधा दुर्बळांचाच नाश करणारं असतं. तसंच काहीतरी .. जर फ़िकीर केलीच नाही तर कधी करायची गरजच पडत नाही. असो .. मग त्याना आमच्या औरंगाबादची बढाई सांगितली तर कळलं की त्या औ'बाद ला जाणारेत मग त्यान घरचा नं. दिला ... आणि have a safe journey ..म्हणुन टाटा केलं. त्या हॊटेलच्या पडवीच्या गार सावलीत १ मांजर आणि त्याचं पिलु झोपलं होतं .. मस्तं दिसत होती ती जोडी. हॊटेलवाल्याला विचारलं किश्किंधाला कसं जायचं .. हो किश्किंधा म्हणजे वालीचं राज्य. त्यानी सांगितलं कि नावेतुन नदी पार करुन जावं लागतं आणि किश्किंधाहुन परत यायला शेवटची होडी ६:३० ला आहे. मग धावत पळत निघालो .. एव्हाना ५ वाजले होते. गाडी होडीत टाकुन नेलं तर तिकडचं सगळं पटकन बघुन होइल. आता नदीपर्यंत पोचायचं तर खुप पायर्या आहेत आणि त्या पायर्यांच्या मध्ये थोडासा उतार केलाय जेणेकरुन गाडी नेता यावी .. तिथुन गाडी उतरवुन होडीपाशी आणली .. ही होडी म्हणजे अगदी लहान होडी. मागच्या वर्षी दिघीहुन मुरुड ला आम्ही मोटर्सायकली अश्याच शिडाच्या होडीत टाकुन नेल्या होत्या. तिथे नावेपर्यंत नेणं आणि नावेतही सोपं होतं फ़क्त नावेत चढवणं अवघड होतं कारण समुद्राचं पाणी जोरदार खालीवर होत होतं. इथे नावेत चढवणं सोपं होतं पण तिथपर्यंत नेणं आणि नावेत ठेवणं अवघड होतं.
१तर जिथे मोटरसायकल होती तो होडीचा भाग मोटरसायकलच्या लांबीएवढा होता मग गाडी gear मध्ये टाकुन आणि दोन्ही ब्रेक आवळुन गाडीवर बसुन गाडीला धरलं. दुसर्या किनार्याला पोचल्यावर गाडी वर चढवणं अवघड होतं. जोपर्यंत पायर्यांवर केलेल्या उतारावरुन चाललो होतो तोपर्यंत ठिक होतं पण वरती १का ठिकाणी पोचल्यावर १का मोठ्या दोंड्यावरुन गाडी चढवावी लागते .. ह्या धोंड्यावर माती होती त्यामुळे गाडीचं मागचं स्लिप होऊन १का बाजुला जायला लागलं आणि मग पायही घसरायला लागले.दोन्ही पाय जमीनीवर त्यामुळे मगचा ब्रेक लावणं शक्य नव्हतं आणि पुढचा लावला तर गाडी घसरत घसरत खाली यायला लागली ... वाटलं आता tripची सांगता होणार. मग धसफ़स न करत १ सेकंद शांत उभा राहीलो गाडी सरळ केली आणि जोरदार try मारला आणि फ़त्ते .. वाहे गुरुदा खाल्सा वाहे गुरु दी फ़तेह॥ वर आल्यावर विचार केला .. मी सारखं बुलेट घ्यायची बुलेट घ्यायची करतोय इथे जर बुलेट असती तर .. ..

तिथे १काला विचारलं पंपा सरोवर कुठाय .. तो मुलगा तिकडेच निघाला होता त्याला गाडीवर घेतलं आणि पम्पा सरोवरापाशी आलो. इथे कोणी कोणी नव्हतं. हे तळं कमळांनी गच्चं भरलं होतं. समोरच छोटसं पंपेचं म्हणजे पार्वतीचं मंदीर होतं. मंदीरात थोड्या वेळ थांबलो आणि लगेच निघालो. वाटे १ साधुबाबा लिफ़्ट मागत होते. का कुणास १दम आदर वाटावा असे होते. त्याना गाडीवर घेतलं. मग कुठुन काय असं विचारलं त्याना आणि त्यानी त्यांची story सांगीतली... आपल्या गो. ने. दांडेकरांसारखं ते आंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडले. " कितने दिन यही सब करेंगे सोचा और निकल पडा घर से ये सब छोडकेभी कुछ अलग मिलेगा या नही ,लेकिन इतना पता है की जो सहि लगा वो किया ". स्वत:शीच म्हणालो आहे आपल्यामध्ये "सगळं जग गेलं गाढवाच्या लग्नाला" म्हणण्याएवढी ताकद... मागे मी असाच विचार करत होतो ..काहीतरी करत राहु... जे आवडतंय आणि जे जमतंय ते कधीतरी सापडेल आणि समजा नाहीच सापडलं तर समाधान तरी असेल कि i m not a quitter. १दा मित्राशी ह्या विषयावर बोलणं चालु होतं .. त्यानी विचारलं "किती दिवस असं हात पाय मारायचे ? काय पाहिजे आहे आणि काय येतंय हे कधी कळणार ? " त्यावर उत्तर दिलं " परिक्षा कधीपर्यंत द्यायची .. जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत" .
त्यांच्याशी बोलताना मस्तं वाटंत होतं. स्वदेस picture चा युही चलाचल राहीच्या वेळचा पार्ट आठवला.
माझं वळण आल्यावर मी थांबलो त्याना नमस्कार केला ..त्यांच्याकडुन प्रसाद घेतला आणि परत किनार्यावर आलो. गाडी होडीत चढवली आणि तिच्यावर बसलो १ विदेशी मुलगी माझा फोटो काढत होती मग तिच्याकडुन माझा tripमधला पहिलावहिला फोटो काढुन घेतला. पण त्या मंद मुलीनी फ़क्त माझाच काढला ति होडी आणि बाकीचं आलंच नाही ..कुठलीही असलीतरी शेवटी मुलगीच ती ... इकडे गाडी वर चढवली आणि १ मंडपाच्या छतावर जाउन बसलो. सुर्यास्त होत होता .. आणि ग्रेसांच्या का खानोलकरांच्या कवितेच्या ओळी ८वल्या
जाहला सुर्यास्त राणी , खोल पाणी जातसे
दुरचा तो रानपक्षी ऐल आता येतसे ..
मेघ रेंगाळुन गेला क्षितीजरेषा किरमिजी
वाजती त्या मंद घंटा कंप त्यांचे गोरजी
सुर्य मावळेपर्यंत तसाच बसुन राहिलो आणि नन्तर रूमवर परत आलो. दुसर्या दिवशी निघायचं असल्यामुळे बॆग आवरली आणि बाजारात फ़ेरफ़टका मारायला बाहेर पडलो. तेंव्हा तिथल्या कुणाच्या लग्नाची वरात निघाली होती. बरयाच दिवसानी अशी गावातली वरात पाहिली. वराती मागुन आमचं घोडं थोडं अंतर चालत राहिलं आणि लै दमल्यामुळे मग घरी परत. १०:३० lights off.

०२-०५-०७.

सक्काळी ४:३० ला उठलो ५पर्यंत आवरुन चेकाउट करुन परत गाडीवर. आदल्या रात्री कुठेतरी पाउस झाला असावा. सकाळी हवा मस्तं थंड होती मातीचा वासही येत होता. हंपीपासुन NH-13 १८ किमी आहे. सकाळी निघतानाच ठरवलं होतं की maximum अंतर सकाळीच पार करायचं. पहिला ब्रेक चित्रदुर्गला म्हणजे १४६ किमी नंतर घ्यायचा ठरवलं. वाटेत १का गावात १का मुलाला लिफ़्ट दिली त्याला चित्रदुर्गलाच जायचं होतं. बराच वेळ गाडी चालवली तरी चित्रदुर्ग येइना १४० शुन्य टप्प्यात म्हणजे जरा जास्तं होतंय असं वाटत. शेवटी शेवटीतर त्या चित्रदुर्गाला ओढुन जवळ आणावं वाटंत होतं.( कोणी सांगीतलंय का १काच दमात करायला ..उगाच !!) . चित्रदुर्गला पोचल्यावर त्या मागे बसलेल्या मुलानी सांगीतलं कि तो पोलिसांच्या ट्रेनिंगला तिथे आलाय. तो लिफ़्ट दिल्यामुळे एवढा प्रचंड खुश झाला कि विचारायला लागला मी काय देउ पैसे देउ का .. चला कुठल्यातरी होटेलात जाउ. त्याला थॆंक यु टाटा करुन पुढे निघालो. इथे चंद्रावळी caves म्हणुन १ चांगली जागा आहे असं मागे guide नी सांगितलं होतं. त्या चंद्रावळीचा पत्ता विचारत निघालो. तिथे पोचालो तर ती एवढी भारी जागा होती.१दम शांत जवळच १ तळं, हिरविगार झाडी. सगळ्याबाजुनी डोंगर आणि अतिशय स्वच्छं. तिथे १ मुलगा होता. त्याला काय वाटलं कुणास ठावुक तो येउन बोलायला लागला. त्याला हिंदी किंवा english दोन्ही निट येत नव्हतं मोडक्या तोडक्या हिंदीतुन आमचं बोलणं चालु होतं. त्याची परिक्षा होती .. म्हणजे pl चालु होती म्हणुन डोकं शांत करण्यासाठी आला होता. त्यानी ती सगळी जागा मला दाखवली. ही जागा म्हणजे boulders नी naturally तयार झालेल्या जागेवर थोडसं बांधकाम करुन केलेली रहाण्याची जागा. ते सगळं बघुन NH-4 कुठे विचारत निघालो .. योगायोगानी १का मुलाची परिक्षा होती त्यालाही त्याच बाजुला जायचं होतं मग त्यालाही लिफ़्ट दिली. सकाळचे १०:३० वाजले होते. चित्रदुर्गमधुन बाहेर पडायच्या जागेवर reliance A1 Plaza आहे तिथे गेलो आणि .... काय सांगायची गरज आहे का ? ;-) .. आणि finally बंगलोरच्या दिशेनी निघालो. परत आवडता NH-4 आला. तिथुन निघालो ते थेट १०० किमी असणार्या कामत उपहार ला येउन थांबलो. रस्त्यावरुन येताना १ मुलगा-मुलगी karizma वरुन भन्नाट स्पीडनी overtake करुन गेले. तेही कामत मध्येच भेटले. कामत मधुन निघुन direct घरी आलो तेंव्हा दुपारचे २ वाजले होते. घरी येउन बघतो तर आमच्या दोस्तानी chicken करायचा घाट घातला होता. मग आंघोळ करुन पोट्भर चिकन खाउन गाढ झोपलो आता ५-६ दिवस गाडी चालवायची नाही म्हणुन ... पण झोपेतुन उठल्यावर :D ... गाडीवर बसुन परत कोरमंगला ....



ह्या प्रवासात खुप लोकांनी मला १कच प्रश्न विचारला कि १टंच का फ़िरतोय ... आता जर १टं फ़िरत नसतो तर चित्रदुर्गचा guide, ती गोट्या खेळाणारी मुलं, त्या australian मुली , ते साधुबाबा , तो चंद्रावळीचा मुलगा .. तो पोलिसभरतीनंतर trainingला चाललेला मुलगा ह्याच्याशी interaction झाली असती का rather ते मला भेटले असते का ??


































6 comments:

Priy@ said...

maaj...!!! jabardast... :)

Parag said...

sahi lihile ahes Adwait. I liked your reaction more than action.

Ambarish said...

ek dam sahi.. jabri.... chayla mi miss kartoy sagLe... wat pahatoy pudhchya blog chi.... keep it up..

aniket said...

झकास! पुढच्या वेळी मी येणार :D

Aditya said...

hi adwait, superb photos! the travelogue is compelling us to go to hampi!

Amruta said...

Nice one!