Friday, April 08, 2011

Puducherry
Me, Vibhor and Vijay


ह्या ठिकाणी काहीतरी लिहीण्याची संधी किंवा वेळ ही तब्बल ३ वर्षांनी येतीये :-), चालायचंच. गेली ३ वर्षे आयुष्यातल्या मोठ्या बदलाशी हातमिळवणी करण्यात गेली. Considering the total life span this seems negligible but as of now it is significant. मध्ये १-२ दा छोट्या छोट्या ट्रिप्स केल्याही पण लिहिण्याजोगं असं फारसं काही नव्हतं  त्यामध्ये आणि माझ्यामते त्या ट्रिप्स नव्हत्याच. ट्रेकला जाउन तर तब्बल ६ वर्ष झाली आहेत. ह्यासगळ्यामुळे जीवाची नुसती घालमेल चालु होती.  छोट्याश्या कारणाने राग अनावर होणे. रस्त्यावर at least १कातरी cab, rickshawवाल्याशी रोज भांडणे असं सुरु झाल्यावर मग वाटलं कि लवकरात् लवकर १ ट्रेक् किंवा ट्रिप झालीच पाहिजे नाहितर मानसिक संतुलन बिघडण्याची दाट शक्यता आहे.  दिवाळीच्यावेळी मस्तं चान्स होता पण बरोबर येण्यासाठी कोणीही तयार नव्हतं आणि उगाच एकटं कुठेही जायचं नाही अशी सक्त ताकिद घरातील सर्व वरिष्ठांनी( अधिकाराने) दिल्याने दगडासारखा घरात बसुन होतो. यावेळी मग लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत जी ट्रिक काम करायची तीच ट्रिक कामी आली. तेव्हा औरंगाबदच्या कडक उन्हाळ्यात घरातुन दुपारी बाहेर खेळायची सरळ सरळ परवानगी मिळत नसे .. त्यात परत दुपारी झोप येण्याचा संबंध नसायचा आणि बैठ्या खेळांशी आपलं आधीपासुनच वाकडं.. मग आईच्या डोक्याशी भुणभुण करायची .. आई रसना पिउ का ? असं दर ५ मिनीटानी विचारणे , भिंतीवर ball मारत बसणे , माळ्यावर चढुन काहीतरी खुडबुड करणे .. मग आपोआप मागच्या अंगणात खेळायला मिळायचं .. तसंच यावेळीही मी बराच त्रासलो होतो आणि मी जाहीर केलं की कोणी येवो न येवो मला माहित नाही मी Pondicherry जाणार. So I had decided to go. I asked few of my friends who I thought may possibly come with me to pondy and each of them had some reason for not coming as it used to be when I was a kid. I got my bike serviced. I didn't use bullet for past 3 months as I didn't want to waste petrol and needed that morally positive feeling. The actual plan was to start using cycle once a week before this trip but the knee didn't recover as fast as I optimistically expected. Now you know how desperate I was for this road trip. I started gathering all the info about this old french colony(Pondicherry) where French is still an official language. After a little googling and the route map I was ready. निघायच्या आदल्यादिवशी आमचे लखनवी नवाब फोन करुन विचारातात " सुना तुम Pondy जा रहे हो" ह्या माणसाला मी १ लाख दिवस आधी मेल पाठवला होता पण हे नवाब ई-मेलवर discussion  करत नाहीत.. ह्याचा परत रुबाब .. उत्तरेच्या लोकांची ही १ गोष्ट भारी असते .. त्यांच्यामध्ये जन्मजातच ही "अकड" असते आता हा मनुष्य कधीकाळी roommate होता त्यामुळे मला त्याची सवय झाली होती. फोनवर साहेब म्हणाले " मेरा लगभग ८८% final है" probably his 88% is equivalent of Barney Stinsen's 83%. अजुन एक कानडीसाहेब म्हणाले "addy बाई वैसे मै भी आ सकता हूं" त्याला थोडं brainwash करुन तयार केलं .. अशा त-हेने ३ लोकं अचानक जमा झाली मी, विभोर(नवाब) आणि विजय . शनिवार २-०४-२०११ ला सकाळी ५ वाजता घरातुन बाहेर पडायचं नक्की झालं.

शनिवार ०२-०४-२०११

सकाळी ४:१५ उठलो आणि नवाबसाहेबसुधा जागे झाले. विजयला फोन केला .. ह्या साहेबाना नुकतीच enlightenment झाली असल्याने ते Gym-protein supplement वरुन प्राणायम आणि meditation अश्य़ा सलमान खान ते बाबा रामदेव ह्या प्रवासात होते. नवाबांना चहाशिवाय सकाळची ध्यानधारणा करता येत नव्हती .. थोडक्यात सकाळी उशीर होणार हे नक्की झाल्याने .. मी माझ्या नेहेमीच्या समयबद्ध मानसिकतेत राहुन चिडचिड करण्याऎवजी शांतपणे जे जे होइल ते ते पहावे ह्या mode मध्ये शिरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मला सकाळी सकाळी चहा मिळाला आणि शिवाय उपाशीपोटी कसं निघायचं ह्या भितीने नवाबांनी तयार केलेले corn-flakes सुधा मिळाले. विजय सकाळी ५ ला विभोरकडे पोचला मीही तयार होउन बसलो होतो विभोरच्या तयारीला अजुन काही(?) वेळ लागणार होता. मग काय विजयने आल्या आल्या TV लावला आणि सकाळी सकळी मोठ्या आवाजात TV लावुन विभोर ला ह्या apt.मधुन कसे बाहेर काढण्यात येइल ह्याचा प्रयत्न सुरु केला.. मग friendsचा १ अख्खा एपिसोड झाल्यावर finally घरातुन बाहेर पडलो. एव्हाना ५:४५ झाले होते.  Trip meter was set and we started towards Hosur road. The newly constructed Hosur road is approx. 12kms long flyover. So once we were on that there was no need to slow down until we reached the toll booth at the end. Vijay was the first to reach the booth, he asked the person on the window to charge for all 3 of us. He took change and moved ahead .. behind him vibhor also started but gate closed and he dashed opened the gate .. and suddenly the alarm started ringing and the guy collecting money shouted "catch him" .. we all were clueless .. what's happening .. I was at the window i told him that Vijay has paid for 3 of us .. he said "no .. only 1 .." this dumb bihari had charged for only one .. I asked him to charge for two(me n vibhor) of us .. but he kept shouting at Vibhor and saying उसे पकडो .. उसने पैसा नही दिया ... and he did the same thing again .. he gave me ticket for 1 ..मग माझं डोकं सरकलं ...गाडीवरुन उतरुन त्याला "सर्व" प्रकारे झाडलं ... idiocracyत दाखवल्याप्रमाणे जगाचा avg. IQ खरोखरच कमी होत असल्याचं दिवसेंदिवस प्रकर्षाने जाणवायला लागलंय. सकाळी सकाळी ईसापच्या गोष्टीप्रमाणे लोक अक्कल परसाकडेला सोडुन येतात कि काय कुणास ठाउक. Finally  matter sort out करुन आम्ही पुढे निघालो. निघताना विजय म्हणाला "addy अपना दिमाग इतना गरम नही करने का सुबह सुबह". मीही स्वत:ला असं ब-याचदा समजवायचा प्रयत्न करतो.. but I always fail to do this. आपल्या इथल्या जवळ जवळ सर्व लोकांना मिळालेला हा वाईट्ट शाप आहे "तेवढ्यानी काय होतं  !!"   .. जरा wrong sideनी गाडी चालवली तर काय होतं .. 2मि. उशिर झाल्यानी काय होतं .. १०रु. ची लाच घेतल्यानी काय होतं... १ दिवस work from home सांगुन काम न केल्यानी काय होतं ... लहानसा बग आहे .. नंतर फ़िक्स करु .. छोटसं फ़िचर आहे .. नंतर चेक करु .. का गोष्टी perfectly करत नाहीत ... हा "चलता है" नावाचा ढिसाळपणा आणि कामचुकारपणा का ? we get to see this stuff everywhere .. even in so called white caller and educated people .... जोपर्यंत हि लोकं company मध्ये असतात तोवर उगाच खोटं खोटं दाक्षिण्य दाखवत असतात .. लिफ़्टमध्ये आधी पुढे जाउ देणे.. बाटलीत पाणी भरत असतील तर बाजुला होऊन ग्लास भरु देणे वगैरे वगैरे पण हीच लोकं जेव्हा कंपनीच्या बाहेर जातात तेव्हा no parkingमध्ये गाडी लावणे .. बायको रस्त्याच्या कडेच्या दुकानात भाजी घेईतोवर रस्त्यात मध्येच गाडी उभी करणे वगैरे शांतपणे करत असतात. as rightly said by one of my friend, these are behaving like cultured people only because somebody who is wise has set the system for these people and these people just know how to follow it. had these ppl been raised in jungles they would have been living not unlike other animals. असो तर असं हे सकाळी सकाळी माझ्या डोक्यात वावटळ निर्माण करुन खिडकीवरले साहेब पुढच्या कामाला लागले होते आणि आम्हीही पुढे निघालो. सकाळचं थंड वारं, मोकळा चौपदरी रस्ता, उन्हाळा असुनही हिरवागार असलेला आजुबाजुचा परिसर ह्यामुळे डोकं शांत होत होतं. होसुरपर्यंतचा रस्ता हा ब-यापैकी रहदारी असलेला आहे. इथुन तमिळनाडु सुरु होतं. डाव्या उजव्या बाजुला वेगवेगळ्या कंपन्यांचे प्लांट्स आहेत. अशोक लेलॆंड आणि टीव्हीएस सुधा बघितल्यासारखं वाटतंय. ह्याच रस्त्यानी (NH-7) पुढे कृष्णगिरीपर्यंत जायचं. कृष्णगिरीच्या जवळ पोचायला लागल्यावर आजुबाजुला छोटे छोटे डोंगर दिसायला लागतात. आजपर्यंतच्या केलेल्या ट्रिप्सपैकी ही माझी पहिलीच ट्रिप होती ज्यात मी उगवत्या सुर्याच्या दिशेला निघालो होतो आणि तमिळनाडुमध्येसुधा पहिल्यांदाच .. खरं केवढा मोठा देश आहे ..उत्तरेच्या लोकांच्या द्रुष्टीने मुंबई म्हणजे साऊथ .. मराठी लोकांच्या द्रुष्टीने बंगलोर म्हणजे साऊथ पण बंगलोरपासुनही कन्याकुमारी साधारण ८०० कि.मी आहे .. एवढा मोठा देश हा एक देश म्हणुन कसा काय टिकुन राहीला .. आश्चर्य आहे खरोखर. २८ राज्य आणि प्रत्येकाची जवळ जवळ वेगळी भाषा. even after being so densely populated how come so many different languages evolved. भाषांमध्ये साधर्म्य आहे no doubt पण १ माणुस दुसरीकडे जाउन लगेच communicate करण्याएवढही नाहिये आणि ह्याचा प्रत्ययही लवकरच यायला लागला. जसे जसे आम्ही बंगलोर पासुन लांब जात होतो तसा तसा माझा कानडी येत असल्याचा अभिमान गळुन पडायला लागला. म्हणजे १०० किमी च्या आतच एवढा फ़रक ?? जर सपाट मैदानी भूभागाची ही अवस्था तर पुर्वोत्तर राज्यांची काय परिस्थिती  असेल ??? how are we going to connect ?  तसा फ़ार मोठा प्रश्न आहे अश्यातला भाग नाही पण जर त्या भाषा येत असल्या तर bond जास्त strong होइल असं मला वाटतं. माझ्या मते कोणत्याही माणसाशी connect  होण्याचे २ सोपे पर्याय म्हणजे १. त्या व्यक्तिची भाषा  किंवा २. त्याचे आवडते अन्न :-) .. not funny, it really works .... शाळेतल्या मुलांना indo-aryan भाषेबरोबरच indo-dravidian आणि ते मुंडा लोक जे होते त्यांची भाषा(tibeto-burman ?) निवडण्याचा पर्याय असतो का ? नसला तर असायला पाहिजे... at least ह्यापैकी १ तरी भाषा यायला पाहिजे. आणि भाषा ह्या लहानपणीच पटकन शिकता येतात कारण तेंव्हा आपला मेंदू एवढा साचेबद्ध आणि logical झालेला नसतो .. जे आहे ते लक्षात ठेवायचं उगाच - हे असंच का?,  मग त्या भाषेत तर असं नाही,  छ्या ! ह्या भाषेला काही नियमच नाही वगैरे अडमुठेपणा यायच्या आत. असो .. तर मजल दर मजल करत .. मध्येच थांबुन डोंगराआडुन वर येणारा सुर्य पहात आम्ही २ तासात कृष्णगिरीला पोचलो. कृष्णगिरीला  पोचलो. कृष्णगिरीला पोचल्यावर NH-7 वरुन डाविकडे वळुन NH-46 घ्यायचा आणि २०० मिटरवर लगेच उजवीकडे वळुन NH-66 घ्यायचा. निघायच्या आधी अनिकेतनी हा रस्ता खराब आहे असं सांगितलं होतं, त्यामुळे मनाची तयारी होती. actually कृष्णगिरी पासुन साधारण ३०किमीचा रस्ता हा खुप खराब आहे पण त्यापुढचामात्र तसा चांगला आहे. रस्ता छोटा आहे पण तशी रहदारीसुधा कमी आहे फ़क्त १खादी बस जर समोर असली तर irritate व्हायला होतं. खड्डे चुकवत आणि चुकुन १खाद्या खड्ड्यात गाडी गेलीच तर गाडीची माफ़ी मागत साधारण ११ वाजता टळटळीत दुपारी तिरुवन्नमलईला पोचलो. ही सगळी तशी छोटी गावं आहेत. तशीच तिथली hotels सुधा छोटी त्यामुळे नवाबांच्या पसंतीस १ही hotel उतरेना आणि विजयची परिस्थीती अगदी लहान मुलासारखी. दुपार झाली भुक लागणार .. भुक लागली लग्गेच खायला पहिजे .. नाहीतर तोंड केविलवाणे करणे .. वाटेत कुठेतरी नाहिसे होणे .. "बाई glucose की कमी मेह्सुस हो रही है" वगैरे dialogue सुरु होतात :-) .. शेवटी १ ठिक्ठाक hotel सापडलं. गेल्यावर इडली वडा order केलं .. आणुन दिल्यावर पाहतो तर काय .. ४इडल्या आणि १ वडा.. हि ह्यांची १ प्लेट. पण तेवढ्यावर भुक भागणार नव्हती म्हणुन ३ डोसे सांगितले .. पहिला डोसा आणल्यावर बघुनच आम्ही गार .. ३-४ डोस्यांएवढा तो १ डोसा होता .. १ डोसा cancel करुन आम्ही मोर्चा पेयांकडे वळवला .. प्रत्येकी ३-४ बाटल्या(कोक आणि मिरिंडा उगाच चावट अर्थ काढु नये) रिचवल्या. ह्या सगळ्याचे बिल बंगलोरपेक्षा अर्धे आले. हे सगळं ह्यासाठी कि जेव्हा केव्हा असल्या ठिकाणी जाल तेव्हा आधि quantity बघणे आणि मग order करणे. तिरुवन्नमलईपासुन परत चांगला रस्ता सुरु होतो. तिरुवन्नमलई ते तिंडिवनम हा रस्ता साधारण चांगला आहे .. पण तिंडिवनम ते pondicherry हा रस्ता awesome आहे .. म्हणजे लै भारी आहे .. ६ पदरी रस्ता, रहदारी जवळजवळ शुन्य, टळटळीत दुपारची वेळ .. आणि जवळजवळ १ ते १.५ किमीपर्यंतची clear visibility.. मग काय बराच वेळ लगाम लावलेल्या आमच्या गाड्या तुफ़ान उधळल्या .. ९० च्या खाली यायचं कामंच नाही.. आणि गाड्याही कुठल्या तर electra, thunderbird आणि pulsar 220. अर्धा तास सतत असं चालवल्यावर engineची थोडी दया आली आणि गाड्या सावलीला लावल्या. तिथुन निघाल्यावर साधारण १५ मि मध्ये पुदुचेरीला पोचलो. आता महत्वाचे काम म्हणजे राहण्याची जागा शोधणे आणि एव्हाना फ़ायनल मॆच सुरु व्हायची वेळ झाली होती. Lonely  planet च पुस्तक उघडुन १केका हॊटेलचा नं. फ़िरवायला सुरुवात केली. माझा अंदाज असा होता की world cup final आणि जाळणारा उन्हाळा ह्यात कोण येणार .. पण अंदाज साफ़ चुकतोय अशी उत्तरं फोनवर मिळायला सुरुवात झाली. finally ginger ह्या महागड्या hotelमध्ये रहायची जागा होती. आता पुढचा प्रश्न ginger शोधणे .. थोडी फ़िराफ़ीर झाल्यावर शेवटी तो लाल बोर्ड दिसला .. एव्हाना विषुववृत्तिय उन्ह ६ तासांचा प्रवास ह्यामुळे दोघेही वैतागले होते पण gingerच्या एसी मध्ये शिरल्यावर हाSSSSयसं वाटलं... पुढचा प्रोग्राम काय तर match :-) .. खाली already बरेच लोक CCD च्या loungeमध्ये मॆच बघत होते .. आम्हीही सामील झालो .. जरा उन्ह कमी झाल्यावर बाहेर पडलो ते थेट beach road ला पोचलो. ह्या रस्त्यावर गाड्यांना परवानगी नाही... हा रस्ता म्हणजे साधारण १किमी चा समुद्राकाठचा रस्ता .. इथे beach असा नाहिये .. मुंबईच्या marine drive सारखा पण छोटा .. वाहनांचा गोंगाट नसलेला .. संध्याकाळी चालायला येणारे लोक .. आमच्यासारखे प्रवासी .. आणि अर्थातच्या खायच्या पदार्थांच्या गाड्या. ह्याच रस्त्यावर गांधीजींचा मोठा पुतळा आहे .. समुद्राकडे पाठ करुन .. हे असं का माहित नाही .. पण त्याच बरोबर Dupldiex पुतळा .. फ़्रेंच war memorial  जुने दीपगृह आहे आणि हे माझं भारताच्या पूर्व किनारपट्टीचं पहिलं दर्शन .... बंगालच्या उपसागराकडे पहिल्यांदाच पहात होतो .. १ वेगळंच feeling होतं .. म्म नाहिये सांगता येत .. पण तो सरळ रस्ता .. आजुबाजुच्या फ़्रेंच इमारती .. वसाहतीची असलेली व्यवस्थित आखणी .. सगळं पाहुन जर भारतावर फ़्रेंचांच राज्य असतं तर परिस्थीती बरीच वेगळी आणि चांगली असली असती असं वाटलं. १ तर ते लोक एवढे aggressive/dominating नसावेत .. आणि फ़्रेंचाविरुद्ध उठाव झालेला वाचल्याचं काही माझ्या आठवणीत नाही. तर पुदुचेरी .. पुदुचेरी हा केंद्रशासीत प्रदेश ३ भागांनी मिळुन बनलेला आहे. त्यातला पुदुचेरी हा सगळ्यात मोठा. इतर दोन भाग म्हणजे आंध्रप्रदेशातील यानम आणि केरळमधील माहे. ह्या सगळ्य़ांमध्ये फ़्रेंच ही कार्यालयीन भाषांपैकी १ आहे. स्वातंत्र्यानंतर १९५४ पर्यंत हा भाग फ़्रेंचाच्याच ताब्यात होता ... आणि तेव्हापासुन ते आजतागायत हा केंद्रशासित प्रदेश आहे. फ़्रेंचाच्या भारतात इंग्रजांविरुद्ध २ मोठ्या लढाया झाल्या १ म्हणजे प्लासी आणि दुसरी म्हणजे वांडिवॊशची.. दोन्हीमध्ये फ़्रेंचांनी मार खाल्ला. पण कुठल्यातरी करारानुसार इंग्रजांनी हा भाग फ़्रेंचांना परत दिला. अजुनही इथे फ़्रेंचाची थोडी छाप दिसते. पोलिसांच्या टोप्या, hotels ची नावं वगैरे वगैरे .. hotel च्या नावावर जाउ नये. नुसतं नाव फ़्रेंच पण खाद्यापदार्थ सगळे देशी पद्धतीचे. १ ’ला तेरास’ .. नावाचं hotel आहे तिथला pizza मात्र मस्तं होता .. बहुतेक मालकीणच pizza करते. अतिशय पातळ बेस आणि अतिशय चविष्ट असा पिझ्झा तिथे मिळतो. संध्याकाळी चालत भटकुन आमचे पाय एव्हाना दुखायला लागले होते आणि मॆच पहायची उत्सुकता होतीच. म्हणुन मग हॊटेल वर परत आलो .. मग काय मॆच..शिट्ट्या .. दंगा  etc. etc. करुन .. सकाळी सुर्योदय पहायचा नक्की करुन झोपलो.


रविवार ०३-०४-२०११

Way to Auroville Aashram
सकाळी ५:४५ ला उठलो .. विभोरनी येणार नाही अस आधीच जाहीर केलं होतं.  विजयही प्रयत्न करकरुन उठला तोवर ६:१५ झाले आणि बाहेर बघितलं तर लक्षात आलं कि आपण पुर्व किना-यावर आहोत आणि सुर्योदय लवकर होत असतो ! .. तरीही जाउन येउ म्हणुन बाहेर पडलो. बीच रोडवर पोचलो तेव्हा तिथे सकाळी पळायला/व्यायामाला आलेल्या लोकांची गर्दी होती .. १ माणुस, त्याची एक २ फ़ुटी मुलगी आणि दुसरी २.५ फ़ुटी मुलगी सुर्याकडे पहात व्यायाम करत होते .. फ़ार भारी द्रुष्य होतं ते... १ फ़िरंगी मुलगी बहुदा नुकत्याच झालेल्या द्न्यानप्राप्तीमुळे प्राणायम करत होती .. १ हातात कागद घेउन काहितरी सुचायची वाट बघत असावी .. १ आजोबा वयाच्या मानाने अगदी कठोर परिश्रम करत होते ... बाजुला फ़ुटपाथवर मुलं स्केटिंगचा सराव करत होती .. कोळी मासेमारी करुन किना-याकडे परतत होते .... १दम happy आणि healthy india चित्र दिसत होतं .. मनाला आलेली सगळी मरगळ - थकवा  नाहिसा होईल असं. नवाब त्यांच्या सकाळच्या विधी पुर्ण करुन चहाच्या शोधात किना-याला पोचले होते आणि विजय साहेब त्यांच्या कामासाठी hotel कडे पळाले ..  ह्यांचा मुख्य interest म्हणजे आरामात राहणे .. योग्य वेळी पाहिजे ते खायला मिळणे .. शरिराला कमीत कमी त्रास देउन जे काही झेपेल ते पाहणे :-) ..  उन ब-यापैकी वाढायच्या आत निघुन बिचवर जायचं ठरलं. खोलीवर जाउन सर्व सामान घेउन आम्ही paradise beachच्या दिशेने निघालो... ह्या बीचबद्दल बरच ऐकुन होतो. १का खाडीतुन बोटीने बीचवर घेउन जातात etc.etc. so we were all excited to go there... हा बीच pondyच्या दक्षिणेला ८किमीवर आहे. १का बोटीतुन साधारण १ किमीवर बीच आहे .. पण गेल्या गेल्या मला जोरदार धक्का बसला .. तिथे "Swimming not allowed" अशी पाटी होती .. च्या मारी मग इतक्या लांबच्या बीचवर आम्ही काय शिंपले गोळा करायला आलो होतो ????  @$##@#%$^&$%$**   जरा कुठे गुडघ्यापर्यंतच्या पाण्यात गेलो कि शिट्टी. हा फ़ारच मोठा भ्रमनिरास होता. आलोच होतो म्हणुन थोडं फ़िरुन घेतलं आणि पुढच्या बोटीने परत निघलो. तिथुन direct Auroville beachवर जायचं ठरलं.. एव्हाना १२ वाजले होते आणि हा beach विरुद्ध दिशेला १२ किमीवर होता ..त्यात नवाब साहेबाना बीचवर जाण्यासाठी nikeचीच short हवी होती .. मग बरच शोधुनही ते दुकान मिळेना आणि वेळही जात होता तेव्हा शेवटी आम्ही वैतागुन १ दुकानपाशी थांबलो आणि इथुन घे अस वसकल्यावर नाखुशिने त्याने कपडे घेतले. दुपारी १ वाजता १दाचे त्या Auroville beach ला पोचालो .. आणि पोचताच डोळ्याचे पारणे फ़िटले .. जे पहायची वाट कित्येक दिवस पाहिली ४-४.५शे किमी गाडी चालवली तो निळाशार समुद्र .. त्या किना-यावर येउन फ़ुटणा-या लाटा .. बस बस !!! पाणी पाहिलं कि मला असाच हर्षवायु होतो .. आणि सुदैवाने गर्दीही फ़ारशी नव्हती .. मग काय गाड्या लावुन direct  पाण्यात .. तिथे तसेच साधारण १ तासभर डुंबत होतो .. थोड्या अंतरावर काही मुली होत्या आणि त्यांचा त्यांचा धिंगाणा चालु होता.  तिथुन थोड्या अंतरावर काही मुलं होती mostly south indian आणि त्यांचही असच काहीतरी चालु होतं .. खेळता खेळाता त्या मुलींच्या अगदी जवळ जाउन खेळायला लागली आणि नंतर मग मुलिंकडे पाहुन ओरडणे वगैरे फ़ालतु प्रकार सुरु झाले .. सुरुवातीला मुलींनी दुर्लक्ष केलंही आणि मीसुधा .. पण नंतर ती अजुनच चेकाळली .. मग मात्र मला सहन होईना .... म्हटलं जाउन सरळ १खाददुस-याला धोपटलं तर बाकीचीही गप्प बसतील आधीच प्यायलेली .. स्वत:च ताबा स्वत:वर नाही ... पण मग म्हटलं आपण निघाल्यावर त्या मुलींना जास्तं त्रास दिला तर ?? आपण मध्यमवर्गिय लोक उगाच फ़ार विचार करायला जातो .. त्यामुळेच मध्यमवर्ग हा सगळ्यात कमी एकी असलेला सगळ्यात सहिष्णु .. आणि त्याचमुळे .. १ पुळचट असा समाजवर्ग असल्यासारखा वाटतो .. आणि  सगळ्यात तिरस्करणीय म्हणजे ही असली जनावरं जन्माला कशी काय येतात .. भय निद्रा आहार आणि मैथुन ह्या level ला असलेले हे प्राणीच आहेत, स्त्रियांकडे मादी ह्या गलिच्छ नजरेने बघणारे ... रस्त्यावरच्या कुत्र्यांना जसं sterile करुन त्यान्चे कान कापुन परत सोडतात ना ..ह्यान्नाही तसच करायला पाहिजे. मग काय सरळ निघालो ... म्हटलं मुलींच्या बाजुला जाउन उभं राहु आणि जर का कोणी आजुबाजुला फ़िरकलं तर सरळ हातापाई करु .. तसही collegeमधुन बाहेर पडल्यास अशी संधी मिळालेली नाहिये .. आणि अजुन थोडे दिवस तर आपण एकटे आहोत .. होऊन जाउ देत ..   मी आणि विजय त्या मुलींपाशी गेलो .. पण काय झालं कुणास ठाउक त्यांच्यापैकी कोणी तिकडे आलं नाही ..  आणि १-२ जण जे त्यांच्याजवळ उभी होते तेही निघुन गेले .. त्या मुलीना विचारलं तुमच्या बरोबर कोणी आहे ना ... तर त्यातल्या दोघीनी आमच्याकडेच संशयानी पाहिलं .. त्यातली १ होती ती समजुन हो आहे म्हणाली .. आणि आम्ही परत समुद्रात निघालो .. विजय म्हणाला ’देख मैने बोला नही था .. उन्हे हम भी वैसेही लगेंगे .. कोइ point नही है हेल्प करने मे’ मलाही १ क्षण असंच वाटलं .. पण जर त्याना आजपर्यंत असेच अनुभव आले असतील तर त्या तरी विश्वास का ठेवतील ?? रागामुळे कानातही नाडीचे ठोके ऐकु येत होते .. समुद्राच्या पाण्यात डुंबल्यावर .. नाकातोंडात पाणी शिरल्यावर जरा शांत झाल्यासारखं वाटलं .. डोकं शांत झालं पण समाधानी नाही .. अजुनही एवढ्या मोठ्या पर्यटन स्थळी मुलींना .. बायकांना मनमोकळं राहता येउ नये ?? .. साधारण तास-दोन तास तिथे घालवल्यावर आम्ही hotelवर परत आलो .. आंघोळी उरकुन लगेच .. अरविंद आश्रम बघण्यासाठी निघालो .. जाण्याधी माझं मत काही फ़ारसं चांगलं नव्हतं .. पण ह्या आश्रमाकडे जायचा रस्ताच एवढा मस्तं होता की सगळे विचार आपोआप पवित्र व्हायला लागल्यासारखं वाटलं .. कोकणातले रस्ते असतात ना १दम तसाच होता .. छोटा पण व्यवस्थित रस्ता दुतर्फ़ा दाड झाडी आणि त्या झाडीचा रस्त्यावर असलेला झाडांचा मांडव .. त्या मांडवाच्या जाळीतुन उन्हाने जमीनीवर काढलेली नक्शी .. सगळंच निरागस .. आश्रमात पोचलो तेव्हा संध्याकाळ झालेली होती .. आणि रविवारी आश्रम बंद असल्याने मात्रीमंदीर बघता येणार नव्हते .. म्हणुन मग तिथे थोडा वेळ फ़िरलो आणि १का झाडाखाली बसलो .. लोकं जाइपर्यंत ... आणि हळु हळु सगळं शांत होत होत .. मग पक्ष्यांच्या आवाजाकडे लक्ष जायला लागलं .. कलत्या उन्हाचा स्पर्श जाणवायला लागला .. झाडांचा वास जाणवायला लागला .. खरंतर किती साध्या गोष्टी आहेत ह्या पण रोज एवढी गर्दी असते .. वासांची .. प्रकाशाची .. आवाजांची .. ह्या गोष्टी दबुन जातात .. आपल्या अंतर्मनाला .. intuition ला सुधा शिक्षणाच्या चाकोरीमुळे असंच होत असेल ? ... असावं कदाचित .. त्या सगळ्या वातावरणात शरीरातुन ..छातीतुन काहीतरी खुप प्रयत्न करकरुन बाहेर पडु पाहतंय असं वाटंत होतं .. किंवा बाहेरचं खुप प्रयत्न करुन आज शिरुन पाहत असावं ... आपणच झाड आपणच ह्या झाडांची माती हे वारं सगळं आपणंच असावं असं वाटायला लागलं .. थोडावेळ डोळे मिटुन घेतले .. फ़क्त त्वचेद्वारेही बरंच काही अनुभवता येतं हे जाणंवलं .. पुन्हा एकदा .. जेव्हाही मी डोंगरावर  किंवा जंगलात असतो तेव्हा ही जाणीव होते .. हिरवंगार गवत .. उत्तुंग कडा .. ह्या सगळ्याचा आपण १ अविभाज्य घटक असल्याची .. त्या माचीवरल्या बुधालाही असंच काहीसं वाटलं असणार .. पहिल्यांदा जेव्हा मी ते वाचलं तेव्हा त्याच्या शरीराल्या लागलेल्या मुंग्यांना चिमण्या टिपतायत हे विचित्र वाटलं होतं .. पण आता ते बरोबरच आहे असं वाटलं .. आणि तो बुधा मातीतुन .. झाडातुन .. ते सगळं पहात असणार ...... i was in no mood of perceiving anything else ..  we left ashram on that note and reached hotel for pleasant  and calm night .. 


सोमवार ०४-०४-०५


RaajaagirI fort
सकाळी लवकर उठुन निघायचं ठरलं होतं .. कारण परतीच्या वाटेवर जिंजीचा किल्ला बघायचा होता आणि रणरणत्या उन्हात तो बघणं काही शक्य नव्हतं .. पण लोकांची तशी तयारी नव्हती . .. मग मीही न ताणता ७ वाजता निघु असं म्हटलं .. सकाळी उठुन कोप-यावरच्या दुकानात फ़क्कड चहा प्यायलो .. चहाच्या effectमुळे विभोर लगेच hotel वर गेला .. मी आणि विजय १२ इडल्या आणि २ वडे रिचवुन परतलो .. आश्चर्य म्हणजे एवढ्या सगळ्याचे फ़क्त ५० रुपये झाले .. बंगलोरला ह्याचे कमीत कमी १५० तरी झाले असते. सगळं संपवुन निघायला ८ वाजले. सगळ्यात पहिला patch तिंडीवनम .. आमचा आवडता .. ह्यावरुन सुसाट निघालो. तासाभरात जिंजीला पोचलो. जिंजीचा किल्ला हा राजागिरी पर्वतरांगामध्ये येतो. ह्याच्या आजुबाजुला २ किल्ले आहेत .. १.राजागिरी २. कृष्णगिरी आणि ३. चिक्कलदुर्ग. ह्यातला राजागिरी हा सगळ्यात उंच म्हणजे साधारण ८००फ़ुट आहे. हे तिन्ही किल्ले १मेकाना नैसर्गिकरित्या जोडलेले आहेत त्याच्यावरच तटबंदी बांधलेली आहे. किल्ला अतिशय चांगल्या स्थितीत ठेवला आहे.. even बांधाकाम सुधा डागडुजी करुन व्यवस्थित ठेवलेले आहे.किल्ल्याच्या आसपास बरीच तळी आहेत. राजागिरी ह्या मुख्य किल्ल्यामध्ये ८ मजली कल्याण महाल, व्यायामशाळा, धान्याची कोठारं उत्तम स्थितीत आहेत. किल्ल्याच्या वाटेवर रंगनाथस्वामी मंदीर आहे हेही छान ठेवले आहे. एकंदरीत दक्षिण भारतातली सर्वच ऎतिहासिक स्थळं छान ठेवली आहेत. १०:३० वाजता भर उन्हात आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली .. माझ्या हिशोबाप्रमाणे १लि. पाण्याची बाटली मी बरोबर ठेवली. पण सुरुवातीच्या १५ मि च्या चढणीमध्येच तो हिशोब साफ़ चुकला असल्याची खात्री पटायला लागली. विभोर ला दर ५मि.नी तहान लागत होती आणि अजुन किती चढायचंय असं तो विचारंत होता .. त्यात परत त्याच्याकडे SLR cameraचं additional ओझं होतं .. मग मी camera माझ्याकडे घेतला .. विजयतर काही ते घेणार नव्हता .. थांबत थांबत पाउण १ तासात वर पोचलो .. वरती मात्र मस्तं वारं वाहत होतं .. उरलं सुरलं पाणी पिउन सावलीत टेकुन बसलो .. वरही ब-यापैकी स्वच्छता होती .. आजुबाजुला लांबलांबपर्यंत शेतं दिसत होती आणि मुख्य म्हणजे एप्रिल महिना असुनही सगळी हिरवीगार होती. वरती १ हवा महालासारखी खोली आहे आणि १ खजिनागृह आहे. थोडी विश्रांती घेउन उतरायला सुरुवात केली .. उन एव्हाना चांगलच तापलं होतं .. सुर्य डोक्यातुन उन्हाचे खिळे जमिनीत मारतोय असं वाटंत होतं कारण डोकं वाईट तापलं होतं आणि पायही जड झाले होते :-) .. खाली पोचलो तेव्हा खालच्या हिरवळीत पाईपनी पाणी सोडलं होतं .. तोंडावर गार गार पाण्याचे सपकारे मारले आणि सावलीला पहुडलो .. घड्याळानी ८वण करुन दिल्यावर निघालो .. आता सगळ्या त्रासदायक प्रकार म्हणजे वाईट रस्ता सुरु होणार होता .. रस्ता सुरु झाल्यावर थोड्या वेळानी त्या खड्ड्यांचा pattern लक्षात यायला लागल्यावर ते चुकवुन गाडीचा वेग maintain करणं जमायला लागलं. आपला मेंदु खरोखर भारी गोष्ट आहे .. it can fit almost everything in a pattern .. 

1. Everything around us can be represented and understood through numbers.
2. If you graph these numbers, patterns emerge. Therefore : There are patterns everywhere in nature.
           -Max Cohen in Pi.

संध्याकाळी ४ च्या सुमारास कृष्णगिरीला पोचलो आणि नि:श्वास  टाकला. आता काय व्यवस्थित चौपदरी रस्ता थेट बंगलोर पर्यंत. रात्री घरी पोचलो तेव्हा सर्व अवयवांनी धन्यवाद दिले आणि मीही त्याना .. मस्तं गरम पाण्यानी आंघोळ केली आणि how i met your mother बघत झोपलो .. :-) ...

5 comments:

यशोधरा said...

भाआरीईही!

Parag said...

As usual mast!!! Barach motha ahe post so roj thoda thoda karat vachla ani ata sampla :) Travelogues madhe ekhadya jagechi mahiti vachyapeksha tithe jaun kay watle he vachyala jast maja yete...ani tuzya blog madhe ase tangents bharpur ahet :) Maybe people and places doesn't matter...we just travel to feel differently!
Sahi lihila ahes....yeudya ajun :)

adwait said...

@यशोधरा : मनापासुन धन्यवाद !
@पराग : अरे ह्या पोस्टच्यावेळी लिहीताना काही वेळा कंटाळा आला एवढा जास्त मजकूर झाला. तु म्हणतोयस ते अगदी बरोबर आहे. माझाही उद्देश तोच असतो .. त्या जागेपेक्षा त्या जागेमुळे काय काय वाटले. its more like journey of thoughts on a journey. कारण त्या जागांविषयीची माहिती इंटरनेटवर already असते. टिकेबद्दल धन्यवाद :-)

PRANAV said...

Ohhh, you did GINGI Fort also...
That's superb!
It is on my wishlist form so long...

-- Pranav.

adwait said...

@pranav : whenever u come to b'lore .. let me know :-) we'll do it again with the other two hillocks